Jalgaon Aeroplane Service : ‘उडान’ योजनेंतर्गत जळगाव शहरातून जळगाव-मुंबई-अहमदाबाद विमानसेवा सुरू झाली. नंतर ती बंद पडली. नव्याने विमानसेवा सुरू होण्याबाबत संभ्रम असताना, आता पुणे, गोवा व हैद्राबादसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.
खासदार उन्मेष पाटील यांनी विमानतळावरील सुविधांसह विमानसेवा सुरू करण्याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश मिळत असून, ‘फ्लाय-९१’ ही विमानसेवेत नव्यानेच सुरू झालेली कंपनी जळगावातून सेवा देण्यास उत्सुक असून, त्याबाबत कंपनीने सर्वेक्षणही केले आहे. (Air services will start from jalgaon to Pune Goa and Hyderabad jalgaon news)
केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत जळगावहून मुंबई व अहमदाबाद येथे विमानसेवा सुरू झाली. २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि ही सेवा तेव्हापासून बंद पडली. नंतरच्या काळात वारंवार प्रयत्न करूनही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे ती पुन्हा सुरू होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.
नव्याने प्रयत्न व यश
खासदार उन्मेष पाटील यांनी खासदार झाल्यानंतर बलून बंधारे, पाडळसे धरण व विमानतळ या कामांना प्राधान्य दिले. त्यात जळगाव विमानतळाची धावपट्टी (रन वे) वाढविण्याचे काम आधी पार पडले. या विमानतळावर रात्री विमान उतरण्याची सोय (नाईट लॅन्डींग) नव्हती. तीही काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली आणि आता जळगावहून ‘उडान’ योजनेंतर्गत पुणे, गोवा व हैद्राबाद येथे विमानसेवा सुरू होणार असल्याने उद्योजक, व्यावसायिकांची मोठी सोय होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
‘फ्लाय-९१’चे सर्वेक्षण
ही विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात ‘फ्लाय-९१’ या कंपनीने सर्वेक्षण केले. त्यानंतर अभ्यास करून त्यासंबंधी प्रस्ताव सादर केला. उन्मेष पाटलांनी विमान प्राधिकरणासह विमान उड्डाण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यातून ही सेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
पुण्याशी ‘कनेक्ट’ मोठी उपलब्धी
या नव्याने सुरू होणाऱ्या सेवेत सुमारे ७५ सीटचे विमान पुण्यासाठी उड्डाण घेईल. मध्ये रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असले, तरी जळगाव-पुणे रेल्वेगाड्या खूप कमी व गैरसोयीच्या आहेत. त्यामुळे विमानसेवा सुरू झाल्यास पुण्याशी कनेक्ट वाढणार असल्याने ती मोठी उपलब्धी ठरणार आहे.
"जळगावची सुवर्णनगरी म्हणून ओळख आहे. पुणे विद्यानगरी, गोवा पर्यटनक्षेत्र, तर हैद्राबाद ‘आयटी हब’ आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी विमानसेवा सुरू होणार असल्याने सुवर्णनगरी या तीनही मोठ्या केंद्रांशी जोडली जाईल, याचे समाधान आहे." -उन्मेष पाटील, खासदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.