रावेर (जि. जळगाव) : येथील पंचायत समितीच्या (panchayat samiti) ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत (Swaccha bharat) झालेल्या टॉयलेट घोटाळ्यातील (Toilet scam) अटकेत असलेल्या सर्व १२ संशयित आरोपींना येथील न्यायालयाने चार दिवसांची म्हणजे २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
येथील न्यायालयात शनिवारी (ता. १६) संशयितांच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला, मात्र न्यायालयाने सर्वांना पोलिस कोठडीच सुनावली. (all suspects in toilet scam case remanded till 20 july jalgaon crime news)
दरम्यान, शुक्रवारी (ता. १५) रात्री उशिरा पोलिसांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दीपक संदानशिव आणि निवृत्त विस्तार अधिकारी डी. एच. सोनवणे यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह या गुन्ह्यातील प्रमुख संशयित समाधान निंभोरे, लक्ष्मण पाटील, बाबुराव पाटील आदी १० जणांनाही पोलिस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, आज येथील न्यायालयासमोर संशयित आरोपींचे वकील राकेश पाटील, धनराज पाटील, योगेश गजरे, दीपक गाढे, शीतल जोशी आणि किशोर पाटील यांनी युक्तिवाद केला. राकेश पाटील यांनी शुक्रवारी रात्री (ता. १५) उशिरा अटक केलेल्या दीपक संदानशिव आणि डी. एच. सोनवणे यांचा या गुन्ह्यात काहीही सहभाग नसल्याचे सांगितले.
मात्र, सरकारी वकील इरफान रंगरेज आणि या गुन्ह्याचे तपासी अधिकारी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी या गुन्ह्यातील सुमारे दीड कोटी रुपयांच्या झालेल्या अपहारात दोन्ही विस्तार अधिकाऱ्यांचा सहभाग आणि संगनमत असल्याशिवाय एवढा मोठा अपहार होणार नाही, असा युक्तिवाद केला.
तसेच मुख्य संशयिताने या दोघांना फोन पेद्वारा आणि समक्ष पैसे दिल्याचेही सांगितले. आजच्या युक्तिवादावेळी न्यायालयात मोठ्या संख्येने संशयित आरोपींच्या नातेवाईकांची गर्दी झाली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.