Jalgaon : शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विलंबाचा आरोप चुकीचा; शहर अभियंता एम. जी. गिरगावकर

Chatrapati Shivaji Maharaj
Chatrapati Shivaji Maharajesakal
Updated on

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्यास आपण विलंब करीत असल्याचा आरोप चुकीचा व दिशाभूल करणारा आहे. आपण लवकरात लवकर पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता एम. जी. गिरगावकर यांनी दिलेल्या खुलाशात म्हटले आहे.

शहर अभियंता गिरगावकर पिंप्राळा व शिवाजीनगरातील पुतळा उभारण्यास विलंब करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर शिवप्रेमी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. याबाबतच्या आरोपावर खुलासा करताना गिरगावकर यांनी म्हटले आहे, की पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव २३ मार्च २०२२ च्या सभेत मंजूर करण्यात आला. (Allegation of delay in statue of Shivaji Maharaj is wrong City Engineer M G Girgaonkar Jalgaon News)

Chatrapati Shivaji Maharaj
Jalgaon Crime News : जेष्ठ नागरीकाचा धावत्या रेल्वेखाली मृत्यु

प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया १६ जूनला आपण महापालिकेत रूजू झाल्यावर सुरू केली. या कामास २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नव्हती, तसेच अंदाजपत्रकास अद्याप प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्राप्त नाही.

तरीही लोकप्रतिनिधींच्या आग्रहास्तव व जनतेच्या भावना लक्षात घेऊन कामास विलंब होऊ नये, म्हणून जबाबदारी घेऊन आपण २४ ऑगस्ट २०२२ ला दरपत्रक मागणीच्या निविदा मागविली. त्यानंतरही आपण निनिदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून महाराजांचे पिंप्राळा येथील पुतळा व स्मारक उभारण्याचा प्रयत्न करीत आहे, यासाठी काही आर्थिक, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीबाबत गंभीर अनियमितता घडत आहे, पण आपण यास क्षमापन करून महासभेत कार्योत्तर मंजूरी देण्यासाठी विनंती करणार आहोत.

Chatrapati Shivaji Maharaj
Jalgaon Crime Update : रिक्षातील भामट्यांनी खिसा कापला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()