बोदवडला स्वीकृत नगरसेवकांची ‘जुगलबंदी’

आतषबाजी करून सत्ताधारी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक नानवानी यांची मिरवणूक काढण्यात आली.
बोदवडला स्वीकृत नगरसेवकांची ‘जुगलबंदी’
Updated on

बोदवड (जि. जळगाव) : शहरातील नगरपंचायत कार्यालयात शुक्रवारी (ता. १७) सकाळी अकराला राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेकडून सूचित केलेले दोघे स्वीकृत नगरसेवक यांच्या नियुक्तीचा ठराव झाला. या वेळी शिवसेनेकडून व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष माजी शहरप्रमुख राजेश नानवानी व राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक ॲड. दीपक झांबड या दोघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली. या निवडीदरम्यान ढोल- ताशांच्या गजरात नगरपंचायत कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आतषबाजी करून सत्ताधारी शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक नानवानी यांची मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील, मुक्ताईनगर तालुकाप्रमुख छोटू भोई, जिल्हा अल्पसंख्याक उपप्रमुख अफसर खान यासह सर्व सत्ताधारी नगरसेवक उपस्थित होते. याउलट राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त झालेले विरोधी गटाचे दीपक झांबड यांनी पदाची जबाबदारी स्वीकारताच नगरपंचायत कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी व जनतेला होत असलेला त्रास लक्षात घेऊन ‘भिख मांगो’ आंदोलन केले. या वेळी राष्ट्रवादीचे गटनेते जफर शेख, नगरसेवक भरत पाटील, मुजमिल शहा हकीम बागवान, लतीफ शेख, मनोज ठोसरे यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते. नगरपंचायत कार्यालयात स्वीकृत नगरसेवक नियुक्ती पार पडल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक नानवानी यांचे अभिनंदन करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील आले असता शिवसेनेचे नगरसेवक अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना ताटकळत ३० मिनिटे वाट पाहावी लागली.

बोदवडला स्वीकृत नगरसेवकांची ‘जुगलबंदी’
पंचनामे करताना पैशांची मागणी केल्यास तक्रार करा

नंतर सर्व नगरसेवक पळत चौकात आले आणि त्यांनी आमदार पाटील यांची मनधरणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत स्वीकृत नगरसेवकाचा सत्कार केला तर आमदार चंद्रकांत पाटील यांना डीपीडीसी बैठकीनंतर सायंकाळी साडेचारला मुख्यमंत्री बैठकीला जायचे होते, पण तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून धावती भेट देण्यासाठी आमदार पाटील आले असता स्वीकृत नगरसेवक जल्लोषामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वेळेचा खोळंबा झाला.

बोदवडला स्वीकृत नगरसेवकांची ‘जुगलबंदी’
बांधकाम नकाशानुसार असल्यावरच पूर्णत्वाचा दाखला : विद्या गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.