Jalgaon Crime News : दुचाकींची कागदपत्रे तपासल्यावर ‘ती’ चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. सहज अधिक माहितीसाठी संशयिताचा मोबाईल धुंडाळत असताना त्याच्या फोटो गॅलरीत चोरीच्या मोटारसायकलसहित कोऱ्या करकरीत तलवारींचाही फोटो उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांना दिसला.
तलवारी दिसताच फटके सुरू झाल्यावर.. ‘साहेब हर्शल राजपूत ट्रान्स्पोर्टने तलवारी मागवून तालुक्यात विकतो..’, अशी गंभीर माहिती पथकाला मिळाली. नंतर त्याला ताब्यात घेण्यात येऊन तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. (Along with stolen bikes thief sells swords Jalgaon Crime News)
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांचे विशेष पथक दुचाकी चोरट्यांचा शोध घेत होते. पाचोरा तालुक्यात एकाजवळ त्यांना चोरीची दुचाकी आढळली. कागदपत्रांची मागणी केल्यावर त्याच्याजवळ कागदपत्रे नव्हती. पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांनी संशयिताचा मोबाईल हातात घेतला. कॉन्टॅक्ट नंबर, गॅलरी, संशयितांचे इतर फोटो पाहत असताना मोबाईलमध्ये चक्क धारदार तलवारींचे फोटो आढळले.
चोरीच्या दुचाकी दहा ते पंधरा हजारांत आणि तलवारी तो ऑर्डरप्रमाणे मागवून देत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस पथकाला मिळाल्यावर क्षणाचाही विलंब न करता पथकाने मोहाडी गाठून हर्शल राजपूत याच्या घरावर छापा टाकला असता तीन नव्या तलवारी मिळून आल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ट्रान्स्पोर्टद्वारे येतो माल
हर्शल राजपूत मोहाडीसह जवळपासच्या गावात आणि तालुक्यात चोरीच्या दुचाकींसह तलवारी विक्रीचा धंदा करतो. नांदेड, राजस्थान आणि ऑनलाइन पद्धतीने तलवारी बुक करून तो, त्या तलवारी ट्रान्स्पोर्टद्वारे मागवतो. नंतर मागविणाऱ्यांना पोहचवत असल्याचे गुन्हेशाखेच्या चौकशीत समोर आले आहे.
अटकेतील हर्शलने आजपर्यंत कुणाकुणाला तलवारी विकल्या आहेत किंवा मोठा घातपात घडवण्याचा कट होता काय? नेमक्या तलवारी मागवून देण्यामागे त्याचा कोणता उद्देश होता, याबाबत तपासात माहिती उघड होणे अपेक्षित असून, त्याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, तपास सुरू आहे.
यांच्या पथकाची कारवाई
पथकातील सहाय्यक निरीक्षक नीलेश राजपूत, गणेश चौबे, सहाय्यक फौजदार अनिल जाधव, नंदलाल पाटील, महेश महाजन, गोरख बागूल, संदीप सावळे, प्रीतम पाटील, जयंत चौधरी, अनिल देशमुख, पोलिस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, ईश्वर पाटील, किरण चौधरी, उमेश गोसावी, लोकेश माळी, चालक पोलिस नाईक अशोक पाटील, प्रमोद ठाकूर, मोतीलाल चौधरी यांच्या पथकाने ताब्यातील संशयिताची योग्य पद्धतीने खातरपाणी केल्यावर त्याने मोहाडी (ता. पाचोरा) येथील हर्शल विनोद राजपूत (२०) याचे नाव सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.