Jalgaon Crime News : अमळनेर येथे घडलेल्या दोन गटांतील दंगलीतील संशयिताचा जळगाव कारागृहात बुधवारी (ता.१४) दुपारी मृत्यू झाला.
दरम्यान या घटनेनंतर अमळनेरमध्ये पुन्हा दंगलीची अफवा पसरविण्यात आली, मात्र तसा कोणताही प्रकार नसून शांतता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. (amalner Riots suspect dies in jail jalgaon crime news)
अमळनेर येथे गेल्या आठवड्यात अल्पवयीन मुलांच्या वादातून दोन गटांत भीषण दंगल उसळली होती. त्यात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिकही जखमी झाले. दोन्ही गटाकडील शेकडो जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. काही जणांना अटकही करण्यात आली. यात संशयित अश्पाक सलीम (उर्फ पक्या) यालाही अटक करण्यात आली होती.
तो सध्या न्यायालयीन कोठडीत जळगाव कारागृहात होता. बुधवारी (ता.१४) दुपारी अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
‘सिव्हिल’मध्ये तणाव
कारागृहात मृत्यू झाल्याची बातमी कळताच समाजबांधवांनी सामान्य रुग्णालय परिसरात गर्दी केली, त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे अमळनेरला पुन्हा वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात करीम सालार, फारूक शेख, एजाज मलिक यांच्यासह कुटुंबीयांचे नातेवाईक, मित्रपरिवार दाखल झाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अश्पाक सलीम याचा मृत्यू कोठडीत झाल्याने या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली आहे.
अमळनेरला तणावपूर्ण शांतता
दंगलीतील संशयित अशपाक उर्फ पक्या सलीम शेख याचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच शहरातील दुकाने सायंकाळी पटापट बंद झाल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. वेगाने मोटारसायकली, रिक्षा घराकडे जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती.
मात्र डीवायएसपी सुनील नंदवाळकर, मारवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, एपीआय राकेशसिंग परदेशी व इतर अधिकारी कर्मचारी यांनी दगडी दरवाजा, सराफ बाजार, कसाली मोहल्ला, इस्लामपुरा, सराफबाजार, पानखिडकी भागात ध्वनिक्षेपकाद्वारे शांततेचे आवाहन केले.
अफवांवर विश्वास ठेवू नका म्हणून संदेश दिले. पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्याने शहरात तणावपूर्ण शांतता होती. आमदार अनिल पाटील, पत्रकार संघटनेने देखील तातडीने सोशल मीडियावर कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. नागरिकांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केल्याने नागरिकांची भीती दूर होऊन सुटकेचा श्वास सोडला. शहरातील संवेदनशील व महत्त्वाच्या भागात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.