Jalgaon News : महाराष्ट्र केसरी-जम्मू केसरी एकमेकांना भिडणार; 5 लाखांचे बक्षीस

अमळनेर तालिम संघ व मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सहकार्याने रविवारी (ता.२८) दुपारी तीनला खड्डाजिनमध्ये विराट कुस्त्यांची दंगल होणार आहे.
Mahendra Gaikwad
Nisar Doda
Mahendra Gaikwad Nisar Dodaesakal
Updated on

Jalgaon News : अमळनेर तालिम संघ व मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या सहकार्याने रविवारी (ता.२८) दुपारी तीनला खड्डाजिनमध्ये विराट कुस्त्यांची दंगल होणार आहे. या वेळी महाराष्ट्र केसरी उपविजेता पहिलवान महेंद्र गायकवाड व जम्मू केसरी पहिलवान निसार डोडा यांच्यात मुख्य कुस्ती रंगणार आहे.

कुस्ती स्पर्धेसाठी पाच लाख रुपये बक्षीस मंत्री अनिल पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. (Amalner wrestling tournament jalgaon news)

या स्पर्धांमध्ये एकूण ३४ कुस्त्या होणार आहेत. त्याचप्रमाणे ऐनवेळी देखील बोलीवर कुस्त्या, खडी जोड लावण्यात येणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून बाजार समिती सभापती अशोक पाटील, मंगळ ग्रह संस्थान अध्यक्ष डिगंबर महाले, जिल्हा सचिव सुनील देशमुख, पहिलवान भानुदास विसावे, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, आदिल पहिलवान, संजय महाजन (एरंडोल) उपस्थित राहणार आहेत.

Mahendra Gaikwad
Nisar Doda
Jalgaon Winter Update : थंडीच्या लाटेने जळगाव जिल्ह्यात हुडहुडी

स्पर्धांचे आयोजन अमळनेर तालीम संघाचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील, पहिलवान संजय पाटील, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, हाजी शब्बीर पहिलवान, महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब पहिलवान, भरत पवार, प्रवीण पाटील, विजय पाटील, विनोद पहिलवान, सुनील वाघ यांनी केले आहे.

राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा होणार असल्याने कुस्तीगिरांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

Mahendra Gaikwad
Nisar Doda
Maharashatra Kesri: महाराष्ट्र केसरीसाठी किताबासाठी सोमवारी वाकडला निवड चाचणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()