जळगाव : नियमित वापरासाठी, तसेच गावठाणापासून २०० मीटरच्या आतील समाविष्ट गटांच्या जमीनमालकांना बिनशेती परवानगीची आता गरज नसल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिली.
राज्य शासनाच्या ५ जानेवारी २०१७ अध्यादेशानुसार जमिनी वापरातील बदलाच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४२ मध्ये सुधारणा केली असून, नव्याने कलम ४२ (ब), ४२ (क) व शासनाच्या १७ जानेवारी २०१८ च्या राजपत्रानुसार ४२ (ड) कलमांचा समावेश केला आहे.
त्यानुसार अंतिम विकास योजना व प्रारूप विकास योजनेत आणि प्रादेशिक योजना व प्रारूप प्रादेशिक योजनेत प्रसिद्ध केलेल्या क्षेत्रात विकास योजनेनुसार अनुज्ञेय वापरासाठी, तसेच गावठाणापासून २०० मीटरच्या आतील समाविष्ट गटांच्या जमीनमालकांना बिनशेती परवानगीची नाही. (Aman Mittal Statement Land within 200 meters from village does not need to be uncultivated Jalgaon News)
या सुधारणेनुसार विविध विभागांचे ना हरकत दाखले, त्यामध्ये होणारा कालापव्यय कमी होऊन जमीनमालकांना सनद दिली जाणार आहे. या सुधारणांनुसार जमिनीची अकृषक वापरात बदल करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली असून, त्यांचा खातेदारांनी फायदा घेतला आहे. या सुसूत्रीकरणामुळे जमिनी त्वरित अकृषक झाल्यामुळे त्यावर विकास करण्यास चालना मिळाली आहे.
जिल्ह्यातील साधारणत: एक हजार ३४८ खातेदारांनी या सुधारणेचा फायदा घेतला आहे. आपण धारण करीत असलेल्या जमिनीवर नमूद सुधारणांनुसार अकृषिक करण्यासाठी पात्र असल्यास आपण अशा पात्र जमिनींचे अकृषक रूपांतरण करण्यास इच्छुक असल्यास वरील सुधारणांचा लाभ घ्यावा, असे जिल्ह्यातील भूधारकांना आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आपले कार्यक्षेत्रातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.