Ambedkar Jayanti 2023 : सजीव आरास, मिरवणुकांनी गजबजले रस्ते!

Dr. Ambedkar jayanti
Dr. Ambedkar jayantiesakal
Updated on

Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त (Jalgaon News) शुक्रवारी (ता. १४) शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. दुपारनंतर निघालेल्या सजीव आरास केलेल्या मिरवणुकांनी रस्ते गजबजले होते. (Ambedkar Jayanti 2023 celebrated with enthusiasm in district jalgaon news)

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, असा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. शाळा व महाविद्यालयांतह जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

काशिनाथ पलोड स्कूल

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड स्कूलमध्ये प्राचार्य प्रवीण सोनवणे, समन्वयिका संगीता तळेले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. स्वाती देशमुख यांनी गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी संविधाननिर्मितीचा प्रसंग सादर केला.

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. आद्या नाईक, हर्ष अमृतकर, स्वरा दलाल, धनश्री पाटील यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली. विद्यार्थी श्रीशॉय चॅटर्जी, नक्ष महाजन यांनी डॉ. आंबेडकरांची वेशभूषा केली होती. विकास कोळी, प्रवीण पाटील, अनिल कोथळकर उपस्थित होते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Dr. Ambedkar jayanti
Jalgaon Market Committee Election : बाजार समितीसाठी दोघांचे अर्ज वैध

अभिनव विद्यालय

माहेश्वरी विद्याप्रसारक मंडळ संचालित अभिनव माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका सरोज तिवारी यांनी करून माल्यार्पण केले. इयत्ता नववीचा विद्यार्थी यश सावळे याने ‘बौद्ध वंदना’ सादर केली. विद्यार्थिनी आम्रपाली हिने भिमगीत सादर केले. उपशिक्षक संतोष सपकाळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.

न्यू इंग्लिश स्कूल

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक योगेश चौधरी यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक सुतार यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.

चांदसरकर विद्यामंदिर

गिरीजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली. जयश्री पाटील, स्वप्नील भोकरे, महेश तायडे, शारदा चौधरी, पूनम पाटील, जयश्री नेवे, ममता पाटील, अनिता वाघमारे, रोहिणी निकुम, वैशाली सोनवणे, मनीषा वाघ, भूषण अमृतकर यांनी सहकार्य केले.

Dr. Ambedkar jayanti
Gold Silver Rate Hike : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सोने- चांदीला पुन्हा झळाळी! सोन्याच्या मागणीत लक्षणीय वाढ

शारदा विद्यालय

येथील शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक रवींद्र चौधरी यांनी केले. प्राथमिक मुख्याध्यापक गोविंदा लोखंडे, रवींद्र पाटील, शिवाजी पाटील, नंदू खरे यांनी मनोगत व्यक्त केले. सागर झांबरे यांनी सूत्रसंचालन केले.

देवकर प्रायमरी

येथील सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक प्रशांत साखरे यांनी केले. उपशिक्षिका सुषमा साळुंखे यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याची माहिती दिली. उपशिक्षक योगेश वंजारी यांनी मनोगत व्यक्त केले. नंदकिशोर ढोले यांनी सूत्रसंचालन केले. अजय भिरूड यांनी आभार मानले.

जैन विद्यालय

येथील प्रतापनगरातील सौ. रत्ना जैन प्राथमिक विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्यााध्यापिका आशा साळुंखे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Dr. Ambedkar jayanti
Gulabrao Patil : जिल्ह्यात 138 संविधान भवन बांधणार : गुलाबराव पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.