Ambedkar Jayanti 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. (Jalgaon News) आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता. (Ambedkar Jayanti 2023 Dr Ambedkar Jayanti celebrated with great enthusiasm jalgaon news)
पुतळ्याभोवती सुंदर सजावट केली असल्याने हा संपूर्ण परिसर खुलून दिसत होता. आमदार अनिल पाटील व शासकीय अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
या वेळी बुद्धवंदना सादर केल्यानंतर सर्वांनी अभिवादन केले. या वेळी आमदारांसह मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलिस निरीक्षक विजय शिंदे, नरसिंग वाघ, डॉ. आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र संदानशिव, प्रा. सुभाष पाटील, सुलोचना वाघ, पालिकेचे संजय चौधरी, ॲड. तिलोत्तमा पाटील, मुन्ना शर्मा, सोमचंद संदानशिव, मुख्याध्यापक आनंदराव नेतकर, सिद्धार्थ सोनवणे, ॲड. एस. एस. ब्रह्मे, विनोद कदम, मनोज पाटील, धनगर दला पाटील यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
प्रताप महाविद्यालयात अभिवादन
येथील प्रताप महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. जयेश गुजराथी व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य उल्हास मोरे यांच्या हस्ते डॉ. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी जयंती व पुण्यतिथी आयोजन समितीचे प्रमुख डॉ. डी. आर. चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. विजय तुंटे यांनी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
या वेळी खानदेश शिक्षण मंडळाचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जयंत पटवर्धन, डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. पराग पाटील, डॉ. कल्पना पाटील, डॉ. विजय मांटे तसेच विविध विभागांचे प्रमुख व महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
मोटारसायकल रॅलीने वेधले लक्ष
सामाजिक परिषदेतर्फे सकाळी दहाला डॉ. आंबेडकर चौकातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली (स्व.) आण्णासाहेब रामभाऊ संदानशिव मार्गे पैलाड, वाडी चौक, माळीवाडा, झामी चौक, तिरंगा चौक, बसस्थानक, कॉटन मार्केट, पिंपळे रोड, कलागुरु, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर, स्टेशन रोड, सुभाष चौकानंतर पुन्हा डॉ. आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला. नरेंद्र संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.
सायंकाळी निघाल्या मिरवणुका
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात विविध ठिकाणी पूजन आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर चौक, फरशी रोड, प्रबुद्ध कॉलनी आदी भागातून सायंकाळी भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. प्रचंड जल्लोष भीमसैनिकांनी केला. यावेळी डीजे मागविण्यात आले असल्याने तरुणाईसाठी ते आकर्षण ठरले. पोलिस प्रशासनाच्या बंदोबस्तात सर्व मिरवणुका शांततेत पार पडल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.