जळगाव : विकासाचा अंबरनाथ पालिकेचा पॅर्टन जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यानी दिली. जळगाव येथील नगरसेवकानी अंबरनाथ येथे विकास कामाची पाहणी केली, त्यावेळी खासदार शिंदे बोलत होते. (Ambernath pattern of development to be implemented in Jalgaon news)
अंबरनाथचे नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या निमंत्रणावरून व पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या सुचनेनुसार जळगाव येथील शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक अंबरनाथ पॅटर्न विकास कामे पहाण्यासाठी गेले होते. या दौऱ्यात त्यांनी अंबरनाथ येथील विकासकामांची पाहणी केली.
अंबरनाथचे नगराध्यक्ष श्री. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेले सिमेंटचे रस्ते, शिवमंदिर, नगरपालिका इमारत आदींची या वेळी पाहणी करण्यात आली. खासदार शिंदे यांचीही भेट त्यांनी घेतली. त्यावेळी श्री. शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात अंबरनाथ पॅटर्न राबविण्यात येइल. लवकरच आपण जळगावला भेट देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
जळगाव महापालिकेच्या आयुक्त विद्या गायकवाड यांची श्री. चौधरी व अंबरनाथचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांच्याशी फोनवर चर्चा झाली. नगरसेवक ॲड. दिलीप पोकळे, कुंदन काळे, चेतन सनकत, गणेश सोनवणे, हर्षल मावळे, किशोर बाविस्कर, गजानन देशमुख, बाळासाहेब चव्हाण, अशुतोष पाटील, शेखर कोल्हे, उमेश सोनवणे या दौऱ्यावर आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.