अमळनेर : तालुक्यातील बोदर्डे येथील बानू रवींद्र भिल हिला प्रसूती कळा जाणवू लागल्याने नातेवाइकांनी १०८ रुग्णवाहिकेस पाचारण केले. अमळनेरच्या १०८ रुग्णवाहिकेला तांत्रिक अडचण आल्याने १०८ चे डॉ. वसीम राजा अन्सारी यांनी पातोंडा येथील १०८ रुग्णवाहिका मागवली. पातोंडा येथून रुग्णवाहिका मागवल्याने वेळ जास्त लागला या दरम्यान बानूची प्रसूती बोदर्डे येथेच आशा स्वयंसेविकेच्या मदतीने झाली.(ambulance confusion made woman condition critical at primary health center in Mandal jalgaon news)
मात्र प्रसूती दरम्यान गर्भावरण मधेच अडकल्याने तिला जास्त त्रास जाणवू लागला. डॉ. अन्सारी यांनी जवळच्या मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील उपचारासाठी नेले. मात्र तेथे डॉक्टर, वॉर्ड बॉय, परिचारिका कोणीच हजर नसल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला. बानूला त्रास वाढू लागल्याने अखेरीस १०८ ने पुन्हा त्या महिलेला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
"तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडत आहे. संबंधित महिलेची प्रकृती चिंताग्रस्त असताना तिला ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात हलवणे क्रमप्राप्त असताना कुटुंबाने मात्र त्या महिलेला ‘पीएचसी’ला हलविले. आमचे काही कर्मचारी मांडळ पीएचसीला उपस्थित होते, त्यांनी मदत केली. " - डॉ. गिरीश गोसावी. तालुका वैद्यकीय अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.