Amit Thackeray : सरकारच्या दुर्लक्षामुळे इर्शाळवाडीची घटनाच; अमित ठाकरेंचा आरोप

Amit Thackeray latest marathi news
Amit Thackeray latest marathi newsesakal
Updated on

Amit Thackeray : इर्शाळवाडीच्या घटनेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी अगोदरच माहिती दिली होती, तसेच सरकारला उपाययोजना करण्यास सांगितले होते. मात्र, राज्य सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यामुळे मोठी दुर्घटना घटना घडली व लोकांना आपले जीव गमवावे लागले, असा आरोप मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. २०) येथे केला.

अमित ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते गुरुवारी जळगावात आले होते. त्यांनी हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (amit thackeray statement about Irshalwadi incident due to government neglect jalgaon news)

श्री. ठाकरे म्हणाले, की इर्शाळवाडीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र, त्याला काहीअंशी सरकारही जबाबदार आहे. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी या दुर्घटनेबाबत अगोदरच सूचित केले होते. त्यांनी सरकारला उपाययोजना करण्याबाबत सांगितले होते.

मात्र, हे सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त असल्यामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. वेळीच लक्ष देऊन उपाययोजना केली असती, तर अशी घटना घडलीच नसती व लोकांना जीव गमवावे लागले नसते.

फोडाफोडीचा जनतेत संताप

राज्यात पक्ष फोडाफोडीबाबत श्री. ठाकरे म्हणाले, की राज्यात पक्ष फोडाफोडी झाली. त्याचा जनतेत तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. पक्षातर्फे राबविण्यात आलेल्या ‘एक सही संतापाची’ या उपक्रमात जनतेने मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Amit Thackeray latest marathi news
Raver Flood News : सातही मंडळांत दुसऱ्यांदा अतिवृष्टी; रावेर तालुक्यात 150 घरांची पडझड

विद्यार्थी सेना बळकटकरणार

मनसे विद्यार्थी सेनेबाबत अमित ठाकरे म्हणाले, की राज्यात विद्यार्थी सेना बळकट करण्यासाठी आपण दौरा करीत आहोत. आपण विद्यार्थ्यांशी थेट ‘वन टू वन’ संवाद करीत आहोत. त्यांच्या अडचणीही समजून घेत आहोत. संपूर्ण विद्यार्थी सेनेची आपण पुर्नबांधणी करणार आहोत.

महाविद्यालयाबाहेर मनसे विद्यार्थी सेनेचे फलक लावण्यात येतील, तसेच त्यावर प्रमुखांचा मोबाईल क्रमांक असेल. विद्यार्थी अडचणीबाबत त्यांच्याशी संपर्क साधतील. प्रमुखाकडून अडचणी सुटल्या नाहीत, तर आपण मुंबईहून सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मोठी अडचण असेल, तर आपण त्या ठिकाणी जाऊन अडचण सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनसे चिटणीस कीर्तीकुमार शिंदे, विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पतंगे, सायली सोनवणे उपस्थित होत्या. प्रारंभी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, अनिल वाघ, मुकुंदा रोटे, विनोद शिंदे, आशिष सपकाळे आदींनी श्री. ठाकरे यांचे स्वागत केले.

Amit Thackeray latest marathi news
Cyber Crime News : सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ चिंताजनक; फेक अकाऊंट काढून बदनामी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.