Jalgaon Municipality Scheme : ...तर घरपट्टीत 5 टक्के सूट; महापालिकेची योजना

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon Municipality Scheme : शहर महापालिकेतर्फे घरपट्टीची बिले नागरिकांना वाटप करण्यात येत आहेत. बिल मिळाल्यानंतर १५ दिवसांत रक्कम भरल्यास त्यावर पाच टक्के सूट देण्यात येईल, असे महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे. (amount is paid within 15 days after receipt of bill 5 percent discount will be given jalgaon news)

जळगाव शहरातील प्रभाग समिती क्रमांक एक ते चार मिळून एक लाख ३२ हजार मिळकती आहेत. त्यापैकी ५४ हजार बिलांचे वाटप करण्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत शंभर टक्के बिलांचे वाटप होणार आहे. प्रभाग समिती एक ते चारमधील मालमत्ताधारकांकडे मुदतीत बिल न वाटप केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रभाग समिती एक ते चार अंतर्गत येणाऱ्या मिळकतधारकांना शनिवारी व रविवारी या सुट्टीच्या दिवशीही प्रशासनाकडून बिलवाटप सुरू राहणार आहे. मिळकतधारकांनी बिल मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत देयक भरल्यास पाच टक्के सूट देण्यात येणार आहे. कर विभागातर्फे सध्या बिलात सुधारणा करण्यात आली असून, बिलावर ‘बेटी बचाव- बेटी पढाव’ हा लोगो जनजागृतीसाठी टाकण्यात आला आहे.

महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून मालमत्ताकराचे मागणी बिलवाटप करण्यापूर्वी करभरणा केला आहे, अशा मालमत्ताधारकांना प्रथमच शून्य रकमेचे बिल देण्यात आले आहे. प्रभाग समिती एकचे नरेंद्र चौधरी, प्रभाग समिती दोनचे प्रकाश सोनवणे व प्रभाग समिती चारचे दीपक फुलमोगरे या प्रभाग समिती अधिकाऱ्यांनी सुचविलेली संकल्पना आहे. यामुळे बिलातील अडचण दूर करण्यात आली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात 108 टक्के कापसाची पेरणी; 91 टक्के पेरण्या पूर्ण

बिलामध्ये मालमत्ता मिळकतधारकाचे नाव व पत्त्यात काही दुरुस्ती करायची असल्यास बिलात दुरुस्ती प्रभाग समिती एक ते चार येथील कार्यालयात करण्यात येईल. त्यासाठी मालमत्ता मिळकतधारकांनी संबंधित प्रभाग समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.

३१ जुलैनंतर मिळकतधारकांना मालमत्ता कराचे मागणी बिलेवाटप झाल्यानंतर जप्तीची कारवाई महापालिका प्रशासनातर्फे केली जाणार आहे. ज्या मालमत्ता मिळकतधारकांनी मालमत्ता कराचा अद्याप भरणा केला नसेल, अशांनी मालमत्ता कराचा भरणा करून मालमत्ता जप्तीची होणारी अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिका अनुदानास पात्र

२०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ मध्ये महापालिकेची मालमत्ता कराची वसुली १३५ टक्क्यांनी वाढली आहे. शासनाच्या धोरणाच्या टॅक्स रिकव्हरी डिपेंडनुसार महापालिका १५ व्या वित्त आयोगाचे अनुदान मिळण्यास पात्र झाली आहे.

Jalgaon Municipal Corporation
CM Eknath Shinde : जनतेचे संकटमोचक गिरीश महाजन : मुख्यमंत्री शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.