Anandacha Shidha: लाभार्थ्यांना आनंदाचा शिधाचे वाटप सुरू; 6 लाख 12 हजार 760 संच उपलब्ध

Nitin Sapke giving happy ration to the beneficiaries at the ration shop in Hari Vitthal Nagar-2.
Nitin Sapke giving happy ration to the beneficiaries at the ration shop in Hari Vitthal Nagar-2.
Updated on

Anandacha Shidha : राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानावर शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप सुरू केले आहे. दिवाळीपूर्वी रेशनकार्डधारकांना शिधा मिळू लागल्याने यंदा गोरगरीब लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. जळगाव जिल्ह्यासाठी ६ लाख १२ हजार ७६० संच आले आहेत.

मैदा, पोहाही संचात

(anandacha shida 6 lakh 12 thousand 760 sets available in district jalgaon news)

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रूपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत आहे.

प्रति शिधापत्रिका एक असे या संचाचे वाटप केले जात आहे. संबंधित रेशनकार्डधारकांनी लवकरात येऊन आनंदाचा शिधा संच घेऊन जावे असे आवाहन जळगाव शहर व ग्रामीण रेशनदुकानदार संघटनेचे अध्यक्ष नितीन सपके यांनी केले आहे.

तालुकानिहाय मंजूर संच

पारोळा ३० हजार १०५

पाचोरा ४५ हजार

चोपडा ४४ हजार ४४३

बोदवड १५ हजार १९५

धरणगाव २९ हजार ७१०

अमळनेर ४६ हजार ३०७

भडगाव २६ हजार ८८५

Nitin Sapke giving happy ration to the beneficiaries at the ration shop in Hari Vitthal Nagar-2.
Anandacha Shidha : शिधात वस्तू वाढल्या, मात्र वजनात घट! दिवाळीत लाभार्थ्यांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा

चाळीसगाव ६१ हजार ८३

जळगाव ८३ हजार ९८८

जामनेर ४७ हजार ५८२

मुक्ताईनगर १७ हजार ६६५

कुऱ्हा ९ हजार ४३५

यावल ३७ हजार २६५

एरंडोल २५ हजार ३६३

भुसावळ ३८ हजार ५००

रावेर ३५ हजार ४५२

सावदा १८ हजार ७८२

एकूण ६ लाख १२ हजार ७६०

Nitin Sapke giving happy ration to the beneficiaries at the ration shop in Hari Vitthal Nagar-2.
Diwali 2023: दिवाळीच्या तोंडावर सुका मेव्याने खाल्ला भाव; नागरिकांच्या खिशाला कात्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.