Anandacha Shidha : आला रे आला, ‘आनंदाचा शिधा’ आला; रेशन दुकानांतून वितरण सुरू

Anandacha Shida distribution started in ration shops in district jalgaon news
Anandacha Shida distribution started in ration shops in district jalgaon newsesakal
Updated on

Anandacha Shidha : ‘गौरी-गणपती’ उत्सव लवकरच सुरू होत आहे. त्यासाठी शासनाने राज्यातील गोरगरिबांना अवघ्या १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्ह्यातील रेशन दुकानांत ‘आनंदाचा शिधा’ पोचला असून, त्याचे वितरण सुरू झाले आहे. त्यामुळे लाखो गोरगरिबांना ऐन सणासुदीत दिलासा मिळाला आहे.

आनंदाच्या शिध्यात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल या जिन्नसाचा समावेश आहे. जिल्ह्यात सहा लाखांवर रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. दरम्यान, संबंधित पुरवठादारांकडून शिधापाकिटांचा पुरवठा झालेला आहे. (Anandacha Shida distribution started in ration shops in district jalgaon news)

शासनाने गत वर्षी दिवाळीत व नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शंभर रुपयांत आनंदाचा शिधा दिला होता. यंदाही राज्यातील एकूण एक कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल.

दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. डाळीही महागल्या आहेत. खाद्यतेलाचे दर आवाक्यात असले, तरी गोरगरिबांना दैनंदिन रोजगारात दिवाळीसह अन्य सणही साजरे करणे सोपे नाही. त्यामुळे हा आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पिशवीवर शासनकर्ते

आनंदाचा शिधा वाटपाच्या पिशवीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार अशा तिघांचे फोटो असून, वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे. तर, खालच्या भागात ‘गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचा शिधा’ असे लिहून त्याखाली अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे नाव आहे. यानिमित्ताने रेशन कार्डधारकांमध्ये शासनकर्ते नजरेसमोर राहात असल्याची प्रतिक्रिया आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Anandacha Shida distribution started in ration shops in district jalgaon news
Jalgaon News : एकीकडे कौटुंबिक हिंसाचारअंतर्गत खटला अन्‌ दुसरीकडे मृत्युशी झुंज..! कॅन्सरग्रस्त पीडिता न्यायालयात

तालुकानिहाय लाभार्थी

तालुका एकूण लाभार्थी

जळगाव ७८,३६३

यावल ४०,८६१

एरंडोल २५,२३९

धरणगाव २९,४४४

पारोळा ३०,४७८

अमळनेर ५०,७८६

जामनेर ४८,९६४

भुसावळ ३९,५३७

Anandacha Shida distribution started in ration shops in district jalgaon news
Anandacha Shidha : ‘गौरी-गणपती’मध्ये 100 रूपयांत आनंदाचा शिधा! जिल्ह्यात 6 लाख लाभार्थी

मुक्ताईनगर १६,३६६

कुऱ्हा ११,४०४

बोदवड १५,२७३

रावेर ३५,६७८

चोपडा ४६,५०१

पाचोरा ४६,०१९

भडगाव २६,५०४

चाळीसगाव ६१,११३

एकूण सहा लाख २० हजार ६५०

"जिल्ह्यातील सहा लाख २० हजार ६५० जणांना हा लाभ मिळेल. प्रत्येक रेशन दुकानातून लाभार्थींपर्यंत शिधा पोचत आहे. त्याचे वाटप शंभर रुपयात सुरू झाले आहे." -संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी

Anandacha Shida distribution started in ration shops in district jalgaon news
Anandacha shidha : आनंदाचा शिधा पोहोचला; गणेशोत्सव होणार गोड!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.