Jalgaon Crime : कुठे गंचाडी धरली.. कुठे महिला पोलिसाला शिवीगाळ..! पोलिसांविरुद्ध वाढला नागरिकांमध्ये रोष

police beating
police beatingesakal
Updated on

Jalgaon Crime : आजही सामान्य माणूस असो की पत्नी, पहिला धाक पोलिसात तक्रारीचा दाखवला जातो. मात्र, संशयित, आरोपी, आडदांड लोकांवरील पोलिसांचा धाक आता संपल्यात जमा असून, पोलिसांची प्रतिमाच स्वतःहून मलीन झाली आहे. कुणीही उपटसुंभ्या वाट्टेल तसा रुबाब करुन निघुन जातो.

अशाच तीन येथे घटना घडल्या. एका घटनेत एकाने रामानंदनगर ठाण्याच्या सहाय्यक फौजदाराची गचांडी धरण्याची हिंमत केली, तर दुसऱ्या एका तक्रारीत महिला पोलिसाला शिवीगाळ करण्यात आली. तर, तिसऱ्या प्रकरणात पत्नीने पोलिस पतीविरुद्धच तक्रार दिली आहे. (anger among citizens against police increased jalgaon crime)

गेल्या काही वर्षात पोलिसच पीडित झाल्याची प्रचिती यासारख्या घटनांवरुन येऊ लागली आहे. नेता-पुढाऱ्यांची जी-हजुरी करणारे पोलीस वरिष्ठांना धाकात घेण्यासाठी राजकीय मंडळींच्या आश्रयाला जावू लागले आहेत. काहींनी पोलिसाची नोकरी पत्करून वेगळेच व्यवसाय मांडल्याने संपूर्ण पोलिस दलाबाबतच समाजात गैरसमज निर्माण होऊन पोलिसांची आदरयुक्त भिती कमी होत चालली आहे.

पोलिसाची गचांडी धरली

मंगळवारी (ता. २९) रात्री पावणे आठच्या सुमारास रामानंदनगर घाट रस्त्यावर क्रेनच्या धक्क्याने झाड पडल्यावरुन वाद सुरु होता. क्रेन चालक व योगेश पाटील नामक व्यक्तीचा वाद सुरु असताना चार्ली पेट्रोलींग पार्टीला कॉल आला. त्यानुसार सहाय्यक फौजदार संजय सपकाळे सहकाऱ्यांसह दाखल झाले.

वादामुळे घटनास्थळावर गर्दी झाल्याने जमाव पांगवण्यात येवुन, वाद घालणाऱ्या दोघांना पोलिस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले. तर, क्रेन चालकाला तुझे वाहन पोलिस ठाण्यात घे, अशा सुचना करत असतानाच योगेश पाटीलने सहाय्यक फौजदार सपकाळे यांच्याशी वाद घातला. ‘

पैसे दिल्याशिवाय क्रेन हलवू नका’ असा दम देत त्याने पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्याला समज देतांना मागेपुढे न पाहता सपकाळे यांची गचांडी धरून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे रामानंदनगर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक गोपाल देशमुख तपास करत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

police beating
Jalgaon Crime : दुरंतो एक्स्प्रेसमध्ये राडा; ‘आरपीएफ’कडून तिकिट तपासणीसाला मारहाण

मुलासह मारुन टाकण्याची धमकी

पोलीस मुख्यालयात कार्यरत महिला पोलिस कर्मचारी मधु तिवाने कुटूंबीयांसह गणपतीनगर पिंप्राळा येथे वास्तव्याला आहेत. मंगळवारी त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या योगेश प्रकाश खडके याने त्यांच्या दारात येत आरडाओरड करण्यास सुरवात केली. जाब विचारल्यावर हा रस्ता सपाट का केला? असे म्हणत त्याने महिला पोलिसाला अश्‍लिल भाषेत शिवीगाळ करुन दमदाटी करायला सुरवात केली.

तसेच, महिला पोलिसासह त्याच्या मुलास मारुन टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी मधु तिवाने यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली असून, खडके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस नाईक हर्षल पाटील तपास करत आहेत.

पोलिसाविरुद्ध पत्नीची तक्रार

पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलिस कर्मचारी शिवाजी पंढरीनाथ सानप आयोध्यानगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी सोनाली सानप (वय २७) यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली.

त्यानुसार त्यांचे पती शिवाजी सानप यांचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबध असून, त्यातून वाद होवुन पत्नीला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर तपास करत आहेत.

police beating
Nashik Crime: फसवणुकीच्या गुन्ह्यातील तोतयांच्या शोधासाठी पोलिसांचे आवाहन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.