Gulabrao Patil : माजी खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांचा स्वप्न पूर्ण करीत राज्य सरकारने केळी महामंडळ स्थापन केले.
त्यासाठी १०० कोटींची तरतूद केली. केळी महामंडळाला खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्यासाठी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव देऊ, अशी घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. (Announcement of Guardian Minister Gulabrao Patil Banana Corporation will be named on haribhau jawale jalgaon)
यावल शहरातील विरारनगरात दोन कोटींच्या विविध विकासकामांच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, की (कै.) जावळे यांचे सतत मार्गदर्शन आम्हाला मिळत होते. केळीला फळाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांची तळमळ होती.
केंद्र सरकारने वंचितांना पाणी मिळावे, यासाठी मोठी तरतूद केली आहे. यात संपूर्ण राज्यात जलजीवन मिशन अंतर्गत काम करताना ‘पाण्यात पक्ष पाहू नये’, अशा केंद्र सरकारच्या सूचना आहेत.
निस्वार्थपणे सत्ताधारी असो, की विरोधक सर्वांच्याच मतदारसंघात योजना राबविली जात आहे. राज्यात ३७ हजार गावांना पाणीयोजना मंजूर केल्या आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आमच्यावर ‘५० खोके, एकदम ओके’, म्हणून विरोधकांनी टीका केली. मात्र, आम्ही खोका खोका करणाऱ्या बोख्यांना विकासातून उत्तर देत आहोत.
शिवसेना जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, उपप्रमुख मुन्ना पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील, डॉ. कुंदन फेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,
शहराध्यक्ष डॉ. नीलेश गडे, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, आर. डी. पाटील, भूषण फेगडे, चेतन पाटील, भरत चौधरी, पी. एस. सोनवणे, बाळू फेगडे, योगेश चौधरी, रितेश बारी यांच्यासह शिवसैनिक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.