Jalgaon News : तरसोद फाट्याजवळील दुसरा सर्व्हिस रस्ता सुरू

Jalgaon: Flyover work in progress near Tarsod Phata
Jalgaon: Flyover work in progress near Tarsod Phataesakal
Updated on

जळगाव : तरसोद फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील तब्बल शंभर वर्षांपूर्वीचा पूल बुधवारी (ता. १८) महामार्ग चौपदरकरणाच्या कामात तोडण्यात आला. तरसोद ते फागणेदरम्यान चौपदरीकरणाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे.

नोव्हेंबर महिन्यात तरसोद फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळ भुसाावळकडून जळगावकडे येण्यासाठी एकतर्फी सर्व्हिस रोड तयार केला होता. बुधवारी जळगावकडून भुसावळकडे जाण्यासाठी दुसरा सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले असून, तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यामुळे आता वाहनधारकांना वाहने विनाअडथळा नेता येतील. (Another Service road near Tarsod Phata is open century old British bridge was demolished Accelerate quadrilateral ization work Jalgaon News)

Jalgaon: Flyover work in progress near Tarsod Phata
Nashik News : मार्चमध्ये रामवाडी पूल दरम्यान नदीपात्रात Boating! दोन्ही बाजूला जेट्टी तयार

गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित असलेल्या तरसोद ते पाळधीदरम्यान बायपास नोव्हेंबरपर्यंत हळूवार सुरू होत आहे. दोन महिन्यांपासून कामाला गती आली आहे. तरसोद फाट्याजवळ उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोड प्रस्तावित आहे.

हे काम वर्षभरापासून बंद होते. अनेक अडचणींचा सामना करीत वाहनधारक वाहने चालवित होते. कंत्राटदाराने भुसावळकडून जळगावकडे येणारा सर्व्हिस रोड डिसेंबर महिन्यात सुरू केला. यामुळे काहीअंशी वाहतुकीच्या कोंडीपासून दिलासा मिळाला होता.

तरसोद ते फागणेदरम्यान महामार्गाचे चौपदरीकरणाचा विषय जिल्हा नियोजन समितीच्या सभेत तीन महिन्यांपूर्वी आमदार एकनाथराव खडसे यांनी गाजविला होता. त्यानंतर कंत्राटदाराने कामास लागलीच सुरवात केली होती.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

Jalgaon: Flyover work in progress near Tarsod Phata
Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!

याठिकाणी जळगावकडून भुसावळला जाणारा व भुसावळकडून जळगावला येणार असे दोन सर्व्हिस रोड, उड्डाणपूल असे मार्ग आहेत. सर्व्हिस रोडच्या मार्गात येणाऱ्या नाल्यावर नवीन पूल बांधण्यात आले.

आता सर्व्हिस रोड सुरू केले आहेत. मुळ महामार्गावर शंभर वर्षांपूर्वीचा दगडी ब्रिटीशकालीन पूल बुधवारपासून तोडण्यास सुरवात झाली. नंतर त्याठिकाणी नवीन पूल बांधून त्यावरून उड्डाणपुलाचा रस्ता उतरविण्यात येणार आहे. कामात अशीच गती राहिली, तर जूनअखेर हा महामार्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

Jalgaon: Flyover work in progress near Tarsod Phata
Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.