Jalgaon News : खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द; 3 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश

Approval of girls children home at Khadke cancelled jalgaon news
Approval of girls children home at Khadke cancelled jalgaon news esakal
Updated on

Jalgaon News : खडके (ता. एरंडोल) येथील (कै.) य. ब. पाटील शिक्षणप्रसारक मंडळ संचालित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.

तसेच या बालगृहातील बाललैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करण्यासाठी पाचसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला ३ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ( Approval of girls children home at Khadke cancelled jalgaon news )

खडके येथील बालगृहातील लैंगिक अत्याचारप्रकरणी बालगृहाचे काळजीवाहक गणेश पंडित, अधीक्षिका अरुणा पंडित आणि संस्थेचे सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्याविरुद्ध २६ जुलै २०२३ ला एरंडोल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अहवालात ताशेरे

जळगाव जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार संस्थेमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Approval of girls children home at Khadke cancelled jalgaon news
Jalgaon Crime News : अनाथांच्या बालगृहातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एरंडोल तालुक्यातील प्रकार

बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ आणि महाराष्ट्र राज्य बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ मधील नियम आणि तरतुदींचे उल्लंघन करणारी आहे.

ही आहे समिती

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रेमा घाडगे (बालविकास प्रकल्प अधिकारी, खार सांताक्रूझ नागरी प्रकल्प, मुंबई उपनगर) यांच्या अध्यक्षतेखाली पाचसदस्यीय विशेष तपासणी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महिला व बालविकास उपायुक्त राहुल मोरे यांनी दिले आहेत.

Approval of girls children home at Khadke cancelled jalgaon news
Jalgaon Crime News : 'त्या' बालगृहात फक्त मुलींवर नाही तर.... धक्कादायक वास्तव आले समोर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com