Jalgaon News : सुटीवर घरी आलेल्या जवानाचा जिन्यावरून पडल्याने मृत्यू; घटनेने परिसरात हळहळ!

army man who came home on leave died after falling from stairs jalgaon news
army man who came home on leave died after falling from stairs jalgaon newsesakal
Updated on

जळगाव : सैन्यदलात नोकरीला असलेला जवान (Army Man) सुटीवर जळगावी आला असता, घरातील जिना उतरताना चक्कर येऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

कांचननगरातील या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशाल भरत सैंदाणे (वय ३५), असे जवानाचे नाव आहे. (army man who came home on leave died after falling from stairs jalgaon news)

विशाल सैंदाणे भारतीय सैन्य दलात कर्तव्यावर होता. काही दिवसांपूर्वीच तो सुट्टीवर घरी कांचननगरमध्ये आला होता. बुधवारी (ता. १५) रात्री नऊला घराच्या पहिला मजल्याच्या जिन्यावरून खाली उतरत असताना, विशालला अचानक चक्कर आले. त्यामुळे तो जिन्यावरून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला.

शेजारच्या नागरिकांनी तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जवानास मृत घोषित केले. एकुलता एक मुलाचे अचानक अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

army man who came home on leave died after falling from stairs jalgaon news
Gharkul Yojana : ‘घरकुल’साठी ‘अमृत’च्या नळकनेक्शनचे धोरणच नाही; रस्ते करण्यास अडथळा

याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. सहाय्यक फौजदार संजय शेलार तपास करीत आहेत. मृत जवानाच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि लहान मुलगा आणि मुलगी, बहीण असा परिवार आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मृत विशाल सैंदाणे याच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. १६) दुपारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाइकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

army man who came home on leave died after falling from stairs jalgaon news
Jalgaon News : शिवाजीनगर पुलाच्या समांतर रस्ता कामाबाबत मक्तेदार बेदखल; स्मरणपत्रांना केराची टोपली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.