Jalgaon Crime : विवाहितेला बिहारमध्ये बोलावून अत्याचार करणारा अटकेत

The suspect was detained by the MIDC team near the railway station.
The suspect was detained by the MIDC team near the railway station.esakal
Updated on

जळगाव : कौटुंबिक वादातून पतीसोबत कडाक्याचे भांडण होऊन २९ वर्षीय विवाहिता घर सोडून निघून जात असताना सोबत काम करणाऱ्या एकाने बिहारमध्ये बोलवून तिच्यावर अत्याचार करून पीडितेची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित राजेशकुमार जयनारायण पासवान (रा. बिहार) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. (Arrested for calling raping married woman in Bihar Jalgaon Latest Crime News)

The suspect was detained by the MIDC team near the railway station.
Bus Fire Accident : सांगाड्यात राख अन् राखेत हात...जगण्याचीही अनोखी लालसा...

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेल्या दांपत्यात वाद होऊन पत्नी रागाच्या भरात घर सोडून निघून गेली होती. पीडितेसोबत एमआयडीसीच्या एका कारखान्यात कामाला असलेल्या राजेशकुमार जयनारायण पासवान (रा. बिहार) याने तिला बिहारला बोलावून घेतले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यासोबत काढलेली छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल होऊन संशयिताचा शोध सुरू होता.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेवरून संशयिताच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असतानाच संशयित भुसावळ येथे आला असून, तेथून पळून जाणार असल्याची गुप्त माहिती निरीक्षक प्रतापसिंह शिकारे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ संशयिताच्या अटकेसाठी पथक रवाना केले. उपनिरीक्षक दीपक जगदाडे, दत्तात्रय बडगुजर, विकास सातदिवे, छगन तायडे, मीनाक्षी घेटे, इस्माईल खान यांच्या पथकाने भुसावळ रेल्वेस्थानक गाठून संशयिताला पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेत अटक केली.

The suspect was detained by the MIDC team near the railway station.
Nashik Crime News : तिच्या साक्षीने ‘तो’ सुटला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.