Rain Update : पावसाची वर्दी देणारे ‘चातक’, ‘पावशा’चे आगमन! मात्र पाऊस पडेना...

Monsoon Update Chatak Bird
Monsoon Update Chatak Birdesakal
Updated on

Rain Update : सृष्टीत नवजीवन नवचैतन्य घेऊन येत असल्याने चराचराला पावसाचे वेध लागले आहेत. मात्र, पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे काही वर्षांपासून पावसाचे आगमन अनियमित होत आहे. (Arrival of Chatak Pavsha bird who gives signal of arrival of rain jalgaon news)

यंदा बिपरजॉय चक्रीवादळामुळे जून महिन्याचे २३ दिवस उलटले, तरी सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे. उशिरा येणाऱ्या पावसाचे संकेत पक्ष्यांना मिळाल्याचे काही पर्यावरण अभ्यासकांनी नमूद केले आहे. परिणामी, पक्ष्यांनी आपली घरटे बांधण्यासही विलंब केला आहे. तर स्थलांतरित पक्ष्यांचेही अद्याप आगमन झालेले नाही.

एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस पडला, त्यावेळी काही पक्ष्यांनी घरटी बांधण्यास सुरवात केली होती. मात्र, मे महिना अतिशय उष्ण गेल्याने घरट्यात पक्ष्यांनी अंडी घातली नाहीत. आता जून महिना निम्मा संपला, तरी दमदार पावसाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे पक्ष्यांकडून घरटी बांधण्यास विलंब होत आहे.

काही पक्षी पाऊस येण्याच्या संकेत देत असल्याचे अभ्यासकांनी निरीक्षणातून नमूद केले आहे. ‘चातक’, ‘पावशा’ या पक्षांचे आगमन हतनूर धरण परिसरात झाले आहे. मात्र, आता त्याठिकाणी घरटे आढळले नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Monsoon Update Chatak Bird
Rain : राज्यात मॉन्सूनची प्रगती संथच! पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्राच्या काही भागात सक्रिय होण्याचा अंदाज

ओरिएंटल ड्रॉप किंगफिशर म्हणजेच तिबोट खंड्याचे, जांभळी लिटकुरी हा पक्षी करवंदाच्या जाळीला किंवा छोट्या-मोठ्या वेलींमध्ये घरट बनवतो, पण त्यांनाही अजून घरटे तयार केलेले नाही. नारंगी कस्तूर हे पक्षीही फारसे दिसत नसून त्याची घरटे बांधण्याची लगबग कुठे दिसून येत नाही. कारूण कोकिळा, सामान्य कोकिळा, असे पक्षी दिसतात.

मानवी हस्तक्षेपामुळे पशुपक्ष्यांच्या जीवनमानातही बदल

जंगलातील वेगवेगळे पशुपक्ष्यांना निसर्गाची चाहूल लागते. पावसाळा लांबल्याने पक्षी आपले घरटे बनविण्यासाठी, तसेच पिल्लांना जन्म देण्यासाठी आणखी कालावधी घेत असल्याचे दिसून येत आहे.

निसर्ग व पर्यावरणात मानवी हस्तक्षेप आणि बदलत्या वातावरणामुळे पशुपक्ष्यांच्या जीवनमानातही बदल होत आहे. हतनूर परिसरात नुकताच ‘चातक’, ‘पावशा’ पक्षी आढळून आल्याने पावसाचे संकेत आहेत, असे चातक नेचर कंझंर्वेशन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी सांगितले.

Monsoon Update Chatak Bird
Nashik Rain Update : जिल्ह्यात 24 ते 48 तासांमध्ये मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.