Jalgaon News : ...अन् शाळेतील फळेही बोलू लागले..!

Art teacher Siraj Tadvi created interest in subject of drawing in  minds of students jalgaon news
Art teacher Siraj Tadvi created interest in subject of drawing in minds of students jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon News : कला ही एक अशी सुप्त शक्ती आहे, ती प्रत्येक व्यक्तीच्या मनात दडलेली असतेच. अशाच कलेचा उपयोग चित्रकला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करतात व शाळेच्या भिंतींवरील फळ्यावर दररोज सुविचार, दिन विशेष, महान पुरुषांच्या प्रतिमा यासह सण, वारांच्या शुभेच्छा अगदी हुबेहूब चित्रित करतात. (Art teacher Siraj Tadvi created interest in subject of drawing in minds of students jalgaon news)

धानोरा (ता.चोपडा) येथील झि. तो. महाजन व ना. भा.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे चित्रकला शिक्षक सिराज तडवी हे गेल्या २६ वर्षांपासून शाळेत रुजू झाले आहेत. खूप कमी वेळात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात चित्रकला विषयाबद्दल आवड निर्माण केली.

त्यामुळे तडवी सर हे शाळेत विद्यार्थी प्रिय शिक्षक बनले. कोरोना काळापासून शाळेतील विद्यार्थ्यांना विविध सुविचार, दिन विशेष, महान पुरुषांबद्दल माहिती व चित्र दररोज फळ्यावर खडूद्वारे हुबेहूब रेखाटून चित्रे बोलके करतात.

त्यांच्या या कलेमुळे विद्यार्थी दररोज सकाळी शाळेत आल्यावर सुविचार, दिनविशेष अगदी नित्यनियमाने वाचतात व त्यातील सद्गुण अंगीकारतात.

तडवी सरांनी आपल्या चित्रकला विषयाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून अनेक विद्यार्थ्यांना चित्रकलेची होणारी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत मार्गदर्शन करून यात विद्यार्थ्यांनी भरभरून यश संपादन केले आहे. यात दरवर्षी २५ ते ३० विद्यार्थी उत्तीर्ण होतात आणि ४ ते ५ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड मिळते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Art teacher Siraj Tadvi created interest in subject of drawing in  minds of students jalgaon news
Jalgaon Bazar Samiti Result : भुसावळला भाजपचे वर्चस्व; ‘मविआ’ला केवळ 3 जागा

सुटीत चित्रकलेची गोडी

विद्यार्थ्यांना आता उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता चित्रकलेच्या माध्यमातून विविध चित्रे रंगवून आपली सुप्त कला सादर करावी, तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांना सुटीत मोबाइलवर वेळ घालवण्यापेक्षा चित्रं काढून त्याला रंगवण्याचे सांगितले तर मुलं मोबाइलच्या विळख्यातून बाहेर पडण्याचा चित्रकला हा उत्तम पर्याय ठरू शकतो, असे सीराज तडवी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

"शाळेतील फळ्यावर दररोज सुविचार, दिनविशेष, चित्रे आदी रेखाटने माझे नित्यनियमच बनलेले आहे. यासाठी मला शाळेचे चेअरमन प्रदीप महाजन, प्राचार्य के. एन. जमादार व सर्व शिक्षकांच्या प्रेरणेने हे सर्व शक्य झाले असून, माझ्या या फळ्यावर रेखाटलेले काही चित्रे, सुविचार आदींमुळे माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात काही बदल होत असेल तर ती माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची बाब आहे." -सिराज तडवी, चित्रकला शिक्षक

Art teacher Siraj Tadvi created interest in subject of drawing in  minds of students jalgaon news
Bazar Samiti Result : चाळीसगाव बाजार समितीत भाजपची सरशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.