Painting Exhibition: संवेदनशील शिवमचा अद्‌भूत कलाविष्कार! जहॉंगीर कला दालनात होणार चित्रांचे प्रदर्शन

शिक्षण घेत असतांनाच १० वर्षांपूर्वी (२०१३ मध्ये) त्याचे संगणकावर साकारलेल्या चित्रांचे पहिले प्रदर्शन जळगावच्या व. वा. वाचनालयाच्या सभागृहात लागले.
Shivam with one of his unique and distinctive works of art.
Shivam with one of his unique and distinctive works of art. esakal
Updated on

"अतिशय हळव्या मनाचा चित्रकार म्हणून शिवम हुजूरबाजारची ओळख आहे. आई- वडील प्रतिथयश डॉक्टर असताना शिवमने त्याच्या आवडीने निवडलेल्या चित्रकला क्षेत्रात जो ठसा उमटवलाय, त्याला कलाक्षेत्रात तोड नाही. त्याच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील प्रसिद्ध जहॉंगीर कला दालनात २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान होतेय, त्यानिमित्त त्याच्या कला प्रवासाचा हा आढावा." -गिरीश कुळकर्णी, जळगाव

(article about painter shivam art jalgaon news )

शिवमने जळगावातील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित ब. गो. शानभाग विद्यालयात १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरु असताना त्याला त्याच्या क्षमतांची व मर्यादांची जाणीव झाली. चित्रकला हा त्याच्या आवडीचा विषय होता. पालक डॉ. संजीव व डॉ. आरती त्याच्या पाठीशी राहिले.

शिक्षण घेत असतांनाच १० वर्षांपूर्वी (२०१३ मध्ये) त्याचे संगणकावर साकारलेल्या चित्रांचे पहिले प्रदर्शन जळगावच्या व. वा. वाचनालयाच्या सभागृहात लागले. या प्रदर्शनाने त्याला प्रेरणा आणि आत्मविश्‍वास दिला. त्यानंतरच्या ५ वर्षात त्याने सलग चित्रकलेच्या साधनेकडे लक्ष दिले.

त्यासाठी त्याने ॲनिमेशनचा डिप्लोमा केला. तसेच VFX (व्हिज्युअल इफेक्ट्स) मध्येही डिप्लोमा पूर्ण केला. प्रज्ञावर्धिनी स्कूल ऑफ आर्टमधून त्याने कला क्षेत्रातील शासकीय पदविका पूर्ण केली. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मार्गदर्शनातून त्याने आपल्या या आवडीला एका उंचीवर नेले.

अमूर्त चित्रशैलीवर भर

लँडस्केप, अमूर्त आणि निसर्ग चित्रांवर त्याचा भर असतो. त्याला ऑइल आणि ॲक्रेलिक पेंटिंगची विशेष आवड निर्माण झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shivam with one of his unique and distinctive works of art.
Art Day : चिंता, हुरहूर, अस्वस्थता.... सर्व मानसिक आजार दूर करते आर्ट थेरपी

त्यानंतर २०१८ मध्ये त्याचे अमूर्त शैलीतील चित्रांचे जळगावच्या पु. ना. गाडगीळ यांच्या आर्ट गॅलरीत पहिले प्रदर्शन लागले.

त्यानंतर जळगाव पीपल्स बँक, माझ्या मनातला कॅनव्हास, जहाँगीर आर्ट गॅलरी, सायमरोझा आर्ट गॅलरी, राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, नेहरु आर्ट गॅलरी, पीएनजी आर्ट गॅलरी व वसंत आर्ट गॅलरी इ. ठिकाणी प्रदर्शन लावण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

विद्यार्थ्यांसाठी त्याने कार्यशाळा देखील आयोजित करून मार्गदर्शन केले व या क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरणा दिली. आजपर्यंत त्याने २८२० ऑइल पेंटिंग, १४६७ ॲक्रेलिक पेंटिंग, १६३० वॉटर कलर पेंटिंग, ९८० पेन्सिल स्केचेस, ३१२० ग्लास पेंटिंग व २४५५ अमूर्त शैलीतील चित्रे साकारली आहेत.

आर्टस्‌ बिट फाउंडेशनचा महाराष्ट्र युवा कला गौरव शिवमला प्राप्त झाला आहे. शिवम सध्या ललित कला विषयात पदव्युत्तर शिक्षण बंगळुरु येथील जैन विद्यापीठातून घेत आहे. त्याच्या या प्रवासास व जहाँगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनासाठी मनापासून शुभेच्छा !

Shivam with one of his unique and distinctive works of art.
Raja Ravi Verma Art Exhibition: राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन 6 सप्टेंबरपर्यंत खुले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.