Ashadhi Ekadashi 2023 : मुक्ताईच्या गाभाऱ्याला खडसेंकडून खजुराची आरास; सव्वा क्विंटल खजूर अर्पण

ashadhi ekadashi 2023 Date palm decoration to muktai core temple by khadse jalgaon news
ashadhi ekadashi 2023 Date palm decoration to muktai core temple by khadse jalgaon newsesakal
Updated on

Ashadhi Ekadashi 2023 : श्रीक्षेत्र कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील श्री संत मुक्ताई समाधीस्थळी गुरुवारी (ता. २९) आषाढी एकादशीनिमित्त माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्यातर्फे आदिशक्ती मुक्ताईच्या गाभाऱ्यात त्यांच्या शेतातील सव्वा क्विंटल बरही खजुराची नयनरम्य आरास करण्यात आली. (ashadhi ekadashi 2023 Date palm decoration to muktai core temple by khadse jalgaon news)

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्री संत मुक्ताई मुळ मंदिरात पहाटेपासूनच आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. संदीप महाराज मोतेकर यांनी मंगल काकड आरती व महापूजा केली.

जे भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ शकले नाही, ते कोथळी व मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनाला येऊन आदिशक्ती मुक्ताईच्या रूपाने भगवान पांडुरंगाचे दर्शन घेतात, अशी ख्याती आहे. त्यामुळे दिवसभर हजारो भाविक दर्शनासाठी आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ashadhi ekadashi 2023 Date palm decoration to muktai core temple by khadse jalgaon news
Ashadhi Ekadashi 2023 : शहरात विठुनामाचा गजर! भाविकांच्या वर्दळीने फुलली विठ्ठल मंदिरे

गुरुवारी सकाळी पावसाला सुरवात झाल्याने भाविकांचा दर्शनाचा आनंद द्विगुणित झाला. या वेळी जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेतले. त्यांनी सांगितले, की सालाबादप्रमाणे श्री. खडसे आणि मंदाताई खडसे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेले आहेत.

मात्र, त्याआधी त्यांनी त्यांच्या बागेतील सव्वा क्विंटल ताज्या बरई खजुराची आरास आदिशक्ती मुक्ताईला अर्पण केली. आदिशक्ती मुक्ताईचे दर्शन घेऊन ‘या हंगामात पाऊस व्यवस्थित होऊन पीक पाण्याने शिवार बहरून शेतकरी बांधवांचे जीवन समृद्ध होऊ दे’. ‘राज्य, बेरोजगारी, महागाई, जातीय द्वेषापासून मुक्त होऊ दे’, अशी मुक्ताई चरणी प्रार्थना केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.

ashadhi ekadashi 2023 Date palm decoration to muktai core temple by khadse jalgaon news
Ashadhi Ekadashi 2024 : एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडावा? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.