Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी (ता. २९) ओंकारेश्वर मंदिर दिवसभर खुले राहणार आहे, असे ट्रस्टींनी कळविले आहे. (ashadhi ekadashi 2023 Omkareshwar temple open all day today jalgaon news)
पहाटे पाच ते सकाळी सातपर्यंत षोडशोपचार अभिषेक व पूजन होईल. सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत रूद्राभिषेक पूजन होईल. दुपारी बाराच्या अभिजित मुहूर्तावर महाआरती होईल. दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत रूद्राभिषेक व पूजन होईल.
सायंकाळी साडेसहाला पुन्हा महाआरती होईल. सायंकाळी दीपदर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना गाभाऱ्यात श्री विठ्ठल रूखुमाईचे दर्शन होणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मुंबईहून विशेष आणलेले हार व फुलांद्वारे नयनरम्य सजावट करण्यात येणार आहे.
भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टींनी केले आहे. ओंकारेश्वर मंदिराजवळ रस्ता व गटारीचे काम सुरू आहे. त्यामुळे भाविकांनी काव्यरत्नावली चौक व डीएसपी चौकमार्गे मंदिरात यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.