Jalgaon Police Transfer : राज्याच्या गृह विभागातर्फे सोमवारी (ता. २०) सायंकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत.
त्यानुसार जळगाव अप्पर पोलिस अधीक्षकपदी अशोक नखाते यांची बदली झाली असून, विद्यमान अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची गुप्तचर प्रशिक्षण शाळा (नाशिक) येथे प्राचार्यपदी बदली झाली. (ashok nakhate is Jalgaon Upper Superintendent of Police news)
जळगाव जिल्हा पोलिस दलात अप्पर पोलिस अधीक्षक पदाची सर्वाधिक काळ यशस्वी सूत्रे सांभाळण्याचा मान अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनाच आहे.
साडेतीन वर्षापेक्षाही जास्त काळ त्यांनी जळगाव पोलिस दलात अप्पर अधीक्षकपदी काढला. प्रत्येक मोठ्या घटनेत प्रत्यक्ष तपासाची सूत्रे हातात घेत घटनास्थळावरूनच तपास सुरू करण्याची ख्याती त्यांनी मिळवली आहे.
अनेक क्लिष्ट गुन्हे, जातीय दंगलीचा तणाव यांसह मोर्चे, उग्र आंदोलने त्यांनी लीलया हाताळली. दगदगीपासून थोडे अलिप्त राहण्यासाठी त्यांनी साइड ब्रॅन्चसाठी एक वर्षापूर्वीच विनंती केली हेाती. मात्र, त्यांच्या बदलीला विलंब होऊन सर्वाधिक काळ त्यांनी जळगावच्या अप्पर अधीक्षक पदाची धुरा यशस्वी सांभाळली.
सोमवारी गृह विभागाने बदली आदेश जाहीर केले असून, गवळी यांची नाशिक येथील गुप्तचर प्रशिक्षण शाळेच्या प्राचार्यपदी बदली झाली असून, त्यांच्या जागी जळगाव अप्पर अधीक्षक पदावर अशोक नखाते यांची बदली झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.