Asian Waterfowl : आशियाई पाणपक्षी गणनेत 149 पक्षी प्रजातींची नोंद!

reservoir of Hatnur Dam
reservoir of Hatnur Dam esakal
Updated on

जळगाव : वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर व चातक निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे हतनूर धरणाच्या जलाशयावर आशियाई (Asian) पाणपक्षी गणनेत,

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या पाणपक्षी गणनेच्या दिवशी १४९ पक्षी प्रजाती आढळून आल्या. (Asian Waterfowl Counts records 149 bird species In reservoir of Hatnur Dam jalgaon news)

त्यामध्ये हतनूर धरणाचे मानचिन्ह असलेले मोठी लालसरी,वारकरी, वैष्णव, तलवार बदक, शेंडी बदक, भिवई बदक, दलदली हरिण पक्षी, ठिपकेदार होला पक्षी मोठ्या प्रमाणात दिसून आले.

या पक्षी गणनेत जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर कृपाली शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन,

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

reservoir of Hatnur Dam
Jalgaon News : आयुक्तांनी वितरित केले खर्चाचे अधिकार

शिल्पा गाडगीळ, उदय चौधरी, सौरभ महाजन, सत्यपालसिंग, समीर नेने, संजय नेने, राहुल चव्हाण, पार्थ बऱ्हाडे यांसह ३५ पक्षी निरीक्षकांनी सहभाग नोंदविला अशी माहिती उपवनसंरक्षक होशिंग यांनी दिली.

चांगदेव, खामखेडी, मेहून, चिंचोल, हतनूर, तांदलवाडी या ५ ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली. हतनूर धरण परिसरातील नदीपात्रात बोटींमधून भ्रमंती करून दुर्बीण व कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्थलांतरित देशी-विदेशी पक्षांचा अभ्यास केला गेला.

देश-विदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची मोठी संख्या पाहता हतनूर धरण जलाशयास ‘महत्त्वपूर्ण पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र’ (आयबीए) हा आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे.

reservoir of Hatnur Dam
Jalgaon News : 3 जागा शासनाने घेतल्या ताब्यात; महसूल विभागाची कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.