Jalgaon Crime News : दुकानात शिरून व्यापाऱ्यावर हल्ला; शहर पोलिस ठाणे परिसरातच व्यापारी असुरक्षित

Jalgaon: Three people beat businessman Kamlesh Motiramani.
Jalgaon: Three people beat businessman Kamlesh Motiramani.esakal
Updated on

Jalgaon News : घरी जाण्यापूर्वी दिवसभराचे उत्पन्न मोजत असलेल्या एका व्यापाऱ्यावर बळीराम पेठेत हल्ला करण्यात आला.

दुकानाची नासधूस करून डोक्यात अवजड काच टाकण्याचा प्रयत्न तिघा हल्लेखोरांनी केला. या प्रकरणी नेहमीप्रमाणे अदखलपात्र गुन्हा नोंदवून शहर पोलिसांनी या व्यापाऱ्याची बोळवण केली. (Assault on shopkeeper by entering shop Traders unsafe in city police station area Jalgaon Crime News)

बळीराम पेठेतील केडी प्लाझामध्ये कमलेश सदानंद मोतीरामानी (रा. गणपतीनगर) यांचे दुकान आहे. बुधवारी (ता. १४) रात्री साडेआठच्या सुमारास तीन टवाळखोर त्यांच्या दुकानात शिरले आणि त्यांनी कमलेश मोतीरामानी यांना मारहाण केली.

त्यांनी दुकानातील साहित्याचे नुकसान केले. दुकानातील पंधरा ते वीस किलो वजनी काच मोतीरमानी यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला.

गल्ल्यातील रोकडही पळवल्याची शक्यता आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. मात्र, पोलिसांनी अदखलपात्र नोंद घेतली.

Jalgaon: Three people beat businessman Kamlesh Motiramani.
Jalgaon News : जिल्ह्यात प्रथमच आढळली करड्या कंठाची पांगळी; पक्षीमित्रांच्या अभ्यासातून नोंद

पोलिस अधीक्षकांना निवेदन

गुरुवारी (ता. १५) सकाळी बळीराम पेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना नेहमीच होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी व्यापाऱ्यांनी पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: Three people beat businessman Kamlesh Motiramani.
Nashik News: पुनर्विनियोजनातील केलेले नियोजन रद्द करा; राज्याच्या नियोजन विभागाकडे 6 आमदारांची तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.