Jalgaon Crime News : दापोरा (ता. जळगाव) येथे अवैध वाळूचा साठा करून त्याची बेकादेशीर विक्री करणारा तालुका पोलिस ठाण्याचा सहाय्यक फौजदार विश्वनाथ गायकवाड यांना पोलिस अधीक्षकांनी चौकशी सुरू असेपर्यंत निलंबित केले आहे. (Assistant police officer running sand contract suspended Jalgaon Crime News)
सध्या जळगाव तालुक्यासह जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसाय फोफावला असून, मोठा आर्थिक फायदा होत असल्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या व्यवसायात अनेक जण गुंतले असून, यात पोलिसही मागे नसल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील दापोरा येथे पोलिस कर्मचारी स्वतःच वाळू ठेका चालवित असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी ई मेलवरून पुराव्यांसह तक्रार केली होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यावरून तालुका पोलिस ठाण्याचे उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी गुरुवारी (ता. ३) गिरणा नदीकाठावरील दापोरा गाव गाठले.
तेथे वाळूचा मोठा साठा आढळला. तो साठा जप्त करण्यात आला. घडल्या प्रकाराची पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी गंभीर दखल घेत कर्मचारी विश्वनाथ गायकवाड यास तडकाफडकी निलंबित केले असून, त्याची खाते अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.