जळगाव : स्वबळ गृहीत धरून तयारीला लागा

पाचोरा येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबिरातील सूर
पाचोरा येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबिरातील सूर
पाचोरा येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबिरातील सूरsakal
Updated on

पाचोरा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सजग व्हावे. राज्य व जिल्हा पातळीचा आदेश आपल्याला बंधनकारक असला तरी आघाडी, युतीचा काय निर्णय व्हायचा तो होईल. सध्या तरी स्वबळावर लढायचे आहे, असे गृहित धरून प्रत्येकाने तयारीला लागा, पक्षाचा सर्वांगीण प्रभाव वाढवा आणि पक्षाचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे हात बळकट करा, असा सूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात उमटला.

पाचोरा येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबिरातील सूर
नांदेड : ओबीसी आरक्षणानंतर निवडणुका घ्याव्यात

महालपुरे मंगल कार्यालयात गुरुवारी (ता. ९) कार्यकर्ता शिबिर झाले. माजी आमदार दिलीप वाघ अध्यक्षस्थानी होते. पालिका गटनेते संजय वाघ, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, अशोक चौधरी, नितीन तावडे, विकास पाटील, अजहर खान, सतीश चौधरी, प्रा. भागवत महालपुरे, डॉ. पी. एन. पाटील, विजय पाटील, दत्ता बोरसे, व्ही. टी. जोशी, प्रकाश भोसले, रणजित पाटील, हारुण देशमुख, बी. एस. पाटील, नाना देवरे, भूषण वाघ, संजय सूर्यवंशी, गौरव वाघ, अशोक मोरे, वासुदेव महाजन, राहुल पाटील, अजय अहिरे, प्रकाश निकुंभ, ॲड. अविनाश सुतार, आर. एस. पाटील, रवींद्र झवर, सत्तार पिंजारी, शालिक मालकर, शंकर बोरसे, हिलाल पाटील, गोकुळ पाटील, प्राचार्य आर. व्ही. पाटील, बशीर बागवान, अरुण पाटील, भगवान मिस्तरी, योगेश पाटील, किशोर डोंगरे, महिला आघाडीच्या सुचेता वाघ, रेखा पाटील, रेखा देवरे, सरला पाटील, प्रमिला वाघ, सुनीता वारुळे, नीलिमा पाटील, छाया पाटील, जिजाबाई पाटील, प्रा. सुनीता गुंजाळ, प्रा. वैशाली बोरकर आदी उपस्थित होते.

पाचोरा येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता शिबिरातील सूर
अकोला : एसटीच्या संपाने गावगाडा थबकला

गौरव पाटील, पीयूष करंदे, गणेश पाटील, गौरव शिरसाठ, राहुल राठोड, गणेश शिंदे, तन्मय शिंदे, सागर शिंदे यांनी मते मांडली. प्रा. भागवत महालपुरे, भूषण पाटील, अजहर खान, नितीन तावडे, शालिक मालकर, वंदना चौधरी, दिलीप वाघ यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन सांगून, त्यांचा ‘सह्याद्रीचा वाघ’, असा उल्लेख केला. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून श्री. पवारांनी घेतलेले समाजोपयोगी निर्णय, कर्जमाफीचे धोरण, महिला आरक्षण, विद्यापीठ नामांतर, समाजातील सर्वच घटकांच्या हितासाठी घेतलेले निर्णय व त्यांची केलेली अंमलबजावणीसंदर्भात माहिती दिली. विविध ठिकाणी निवड झालेले प्राचार्य आर. व्ही. पाटील, सरला पाटील, शालिक मालकर, सिद्धार्थ पवार, अरुण पाटील, राजू पाटील, वंदना चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. विकास पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संजय वाघ यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.