Jalgaon News : पृथ्वीभोवती फिरणाऱ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा तेजस्वी चांदणीच्या रूपात दिसणारे अद्भुत दृष्य जळगावकरांनी शुक्रवारी (ता. १२) रात्री अनुभवले. (Astronomers experience view of space station jalgaon news)
जमिनीपासून ४०० किलोमीटर उंचीवरून २७ हजार ६०० किलोमीटर प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने आकाशातून एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला जाणारे हे स्पेस स्टेशन शुक्रवारी अनुभवास आले.
सायंकाळी सात वाजून ५९ मिनिटांनी दक्षिण-पश्चिम दिशेच्या मधून येताना ते चांदणीच्या रूपात दिसायला लागले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जस जसे ते पुढे पुढे जात होते, तसतसा त्याचा तेजस्वीपणा वाढत होता. डोक्यावर आल्यावर त्याचा तेजस्वीपणा शुक्र ग्रह जितका तेजस्वी दिसतो, साधारण तितका तेजस्वी झाला.
निसर्गाने आकाशात ढगांचा कोणताही व्यत्यय न आणल्यामुळे सर्वांना हा अदद्भुत नजारा बघता आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.