चंद्र- मंगळ पिधानयुतीचा शनिवारी अनोखा योग

१२ तारखेला अमावस्या असल्याने १७ तारखेला चंद्राची कोर आणि मंगळ असे अदभूत दृश्य दुर्बिणीतून एकाच वेळी बघता येईल.
चंद्र- मंगळ पिधानयुतीचा शनिवारी अनोखा योग
Updated on

जळगाव : चंद्र आणि मंगळाच्या पिधानयुतीचा अद्‌भूत आणि प्रेक्षणीय चमत्कार शनिवारी १७ एप्रिलला बघायला मिळणार आहे.

‘पिधानयुती’ हे पण एक प्रकारचे ग्रहणच असते. जसा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते किंवा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होते तसेच मंगळ आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आला की मंगळग्रहण होते या ग्रहणाला ‘पिधानयुती’ (Occultation) असे म्हणतात.

असा असेल योग

१७ एप्रिलला सायंकाळी ५.४७ मिनिटांनी या पिधानयुतीला म्हणजे चंद्र मंगळाच्या समोर यायला सुरवात होईल. सूर्य आकाशात असल्याने आपण ते बघू शकणार नाही. सूर्यास्तानंतर ज्यावेळी चंद्र आपल्याला दिसायला लागेल त्यावेळी चंद्राने मंगळाला पूर्ण झाकलेले असेल. साधारण ७ वाजून २१ मिनिटांनी मंगळ चंद्राच्या मागून हळूहळू बाहेर यायला लागेल. ७ वाजून २७ मिनिटांनी मंगळ पूर्णपणे बाहेर आलेला असेल आणि हेच ते प्रेक्षणीय दृश्य असेल. १२ तारखेला अमावस्या असल्याने १७ तारखेला चंद्राची कोर आणि मंगळ असे अदभूत दृश्य दुर्बिणीतून एकाच वेळी बघता येईल.

सध्या लॉकडाऊनमुळे कार्यक्रमचे आयोजन शक्य नसल्याने या अदभूत आणि प्रेक्षणीय खगोलीय घटनेचे लाइव्ह प्रक्षेपण यू-ट्यूबवरून केले जाणार आहे. त्याची लिंक - https://youtu.be/FuvsRrKWwdw किंवा Astro Amogh असे youtube वर टाकले तरी चालेल. - अमोघ जोशी, खगोल अभ्यासक

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.