Jalgaon News : चाळीसगावातील वारकरी विठूरायाच्या चरणी; पंढरपूर वारीतून ३ हजार भाविकांचे दर्शन

Chalisgaon: MLA Mangesh Chavan and office bearers along with the workers who participated in the war of Pandharpur.
Chalisgaon: MLA Mangesh Chavan and office bearers along with the workers who participated in the war of Pandharpur.esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील सुमारे तीन हजार भाविकांची ‘वारी’ मंगळवारी (ता. २०) पंढरपूरकडे रवाना झाली होती.

या वारीचे पंढरपूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले. आमदार चव्हाण यांनी स्वखर्चाने आरक्षित केलेल्या विशेष रेल्वेने पंढरीचे दर्शन घडविले. चोख नियोजनात पार पडलेल्या या वारीत समाधान व्यक्त केले.

पंढरपूरची वारी मंगळवारी (ता. २०) विशेष रेल्वेने मार्गस्थ झाली. या वेळी वरुणराजाचे आगमन झाल्याने सर्वांनाच हायसे वाटले. पंढरपूर येथे २२ डब्यांच्या विशेष रेल्वेने १२ तासांचा प्रवास करून ही वारी २१ जूनला सकाळी दहाच्या सुमारास पंढरीत दाखल झाली.()

यावेळी पंढरपूर स्थानकावर भाविकांचे जल्लोषात स्वागत झाले. जिल्हा बँकेचे चेअरमन, पंढरीचे अविरत वारकरी संजय पवार व तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी यांनी तुळशीमाळ घालून व सुवासिनींनी औक्षण करून आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या परिवाराचे व वारकऱ्यांचे स्वागत केले.

त्यानंतर शनी महाराज संस्थान मठात सर्व वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

त्यानंतर वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराकडे रवाना झाले. दरम्यान, सकाळच्या जेवणात वरण भात, दोन भाज्या, फ्रूट सालाड, जिलेबी, पोळी, पुरी, मठ्ठा, भजी, फरसाण आदी पदार्थांची रेलचेल होती तर सायंकाळी बटाटा भाजी, मिरची भाजी, पुरी, गुळाची लापशी, कढी, भात अशा भोजनाचे वारकरी तृप्त झाले. संपूर्ण वारीत हजारो वारकऱ्यांची दोनवेळच्या भोजनासह, आंघोळीची, आरामाची व्यवस्था आमदार चव्हाण यांच्या खर्चाने करण्यात आली. दरम्यान, आमदार चव्हाण यांनी रेल्वेतील प्रत्येक बोगीत जाऊन भाविकांची विचारपूस केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Chalisgaon: MLA Mangesh Chavan and office bearers along with the workers who participated in the war of Pandharpur.
Jalgaon News : वरखेडी गुरांच्या बाजारात विक्रमी उत्पन्न; योजनांची यशस्वी अंमलबजावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()