Jalgaon News : जाणाऱ्याचा जीव गेला..अन्‌ राजकारणाने झोपाळा केला! ‘गावकी’वर राजकारणाचा प्रयत्न

नेरी- म्हसावद रस्त्यावर सुसाट केमिकल टँकरने धडक दिल्याने सुखलाल पंडित सोनवणे (५५, रा. विटनेर, ता. जळगाव) यांच्यासह एक म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.
Family members and villagers of the accident victim stopped the road near the dead body till late at night, grumbling in the cold.
Family members and villagers of the accident victim stopped the road near the dead body till late at night, grumbling in the cold.esakal
Updated on

Jalgaon News : नेरी- म्हसावद रस्त्यावर सुसाट केमिकल टँकरने धडक दिल्याने सुखलाल पंडित सोनवणे (५५, रा. विटनेर, ता. जळगाव) यांच्यासह एक म्हैस जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.

दुपारी दीड वाजता घडलेल्या अपघातात मृतदेहासह तब्बल दहा तास कुटुंबीय ग्रामस्थ नुकसान भरपाईच्या अपेक्षेने रस्त्यावर आडून बसले. (attempt to political angle to man and buffalo accident death case jalgaon news)

अखेर निरीक्षक किशन नजन पाटील यांनी कायदेशीर मदत आणि योग्य मार्गदर्शन करून कुटुंबीयांची समजूत काढल्यावर वादावर पडदा पडला. गावकीवर राजकारण करणाऱ्यांनी अधिवेशन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर हा घटनापट लिहिल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.

विटनेर (ता. जळगाव) येथील नेरी -म्हसावद रस्त्यावर मंगळवारी (ता.१९) दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुखलाल पंडित पाटील (वय ५०) हे चराईला गेलेल्या म्हशी घेऊन घराकडे परतत होते. नेरीकडून सुसाट वेगाने विटनेरमार्गे एरंडोलकडे केमिकल घेऊन जात असलेल्या (जीजे १२ बीव्ही ७४७५) टँकर चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या म्हशीसंह सुखलाल सोनवणे यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात एक म्हैस टँकरच्या पुढील चाकांमध्ये अडकून मृत्युमुखी पडली तर, सुखलाल सोनवणे यांनाही जबर धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला होता. एक म्हैस गंभीर जखमी होऊन जायबंदी झाली. अपघात घडताच ग्रामस्थांनी रस्त्याच्या दिशेने धाव घेत टँकरला घेराव घातला.

कुटुंबीयही धडकले.. बघता बघता संपूर्ण विटनेर गाव रस्त्यावर उतरून त्यांनी रस्ता रोको केला. कुणी टँकर पेटवून देण्याच्या प्रयत्नात होते.. मात्र, टँकरमध्ये अतिज्वलनशील रसायन असल्याचे कळाल्यावर हा प्रयत्न होऊ शकला नाही. या सर्व घटनाक्रमात ज्यांना प्रकरण तापवायचे होते त्यांना संधी हातची चालून आल्याने ग्रामस्थांच्या संतापात अधिकचे तेल पडले.

Family members and villagers of the accident victim stopped the road near the dead body till late at night, grumbling in the cold.
Jalgaon News: जिल्ह्यात 8 महिन्यांत 2 कोटींवर महिलांचा एसटी प्रवास; महिला सन्मान योजनेमुळे महामंडळाला नवसंजीवनी

दहा तास ग्रामस्थ रस्त्यावर

मयत सुखलाल पाटील यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती जेमतेम.. कष्ट करतील तर, खायला मिळले. त्यात कुटुंबाचा कर्ता पुरुषच निघून गेला आणि दोन- अडीच लाखांची एक म्हशीचा मृत्यू आणि एक जायबंदी झाली होती.

काही का होईना या परिवाराला आजच खायचे वांधे नको म्हणून नुकसान भरपाईसाठी ग्रामस्थांनी एकजूट केली. मदत मिळत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्यानंतर काही समजूतदार मंडळींनी मृतदेह उचलण्यासाठी सलग पाच वेळा प्रयत्न केले. संतप्त ग्रामस्थांनी रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक रोखून धरली.

पोलिसांची भरली जत्रा

घटना घडल्यावर एमआयडीसी पोलिस पथक पोहोचले. निरीक्षक आर.टी. धारबळे यांनी चर्चा केली. डीवायएसपी संदीप गावित पोचले त्यांनी बोलून बघितले. मात्र, ग्रामस्थ चिडण्याची परिस्थिती असल्याने त्यांनीही ‘वेट ॲण्ड वॅाच’ची भूमिका घेतली. खबरदारी म्हणून शीघ्रकृती दलाच्या ६० जवानांच्या दोन तुकड्या पाचारण करण्यात आल्या.

एमआयडीसी- रामानंदनगरचे अतिरिक्त पोलिस, गुन्हे शोध पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेचे दुय्यम अधिकारी कर्मचारी घटना स्थळावर परिस्थिती हाताळत होते. रात्रीचे साडेदहा वाजले तरी.. रस्ता रोकोचा विषय सुटता सुटेना. अखेर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी वरिष्ठ निरीक्षक किशन नजन पाटील यांना रवाना केले. त्यांनी जळगाव शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याला सोबत घेत घटनास्थळ गाठले.

Family members and villagers of the accident victim stopped the road near the dead body till late at night, grumbling in the cold.
Jalgaon News : महायुतीत चुकीच्या वक्तव्याने वातावरण दूषित करू नका! : जिल्हाध्यक्ष जळकेकर

अन्‌ गोंधळाची वीण सुटली..

पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई, रस्त्यावर स्पीड ब्रेकर यासह एकामागून एक मागण्यांच्या पूर्ततेचा विषय समोर येऊ लागला. मृताचे कुटुंबीय खरेाखर गरीब व मेहनतीवर जगणारा परिवार.. त्यात कुटुंबाचा कर्ता गेल्याने कणा मोडला.. त्यांना आजच जगण्याची नव्याने सुरवात करावी लागणार होती.

ह्या सर्व बाबींसह चर्चा करून शक्य ती कायदेशीर मदत करून दाखल गुन्ह्यातून अपघातग्रस्त विमा अंतर्गत या कुटुंबीयांच्या पदरी पडणारी आर्थिक मदत पाहता अगदी किरकोळ मागणीसाठी विषय ताणून धरल्याचे निरीक्षक पाटील व सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिल्यावर समजूतदार ग्रामस्थांनी म्हणणे मान्य केल्यावर साडेअकराच्या सुमारास मृतदेह उचलला.

अधिवेशनाचा प्रभाव

नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु होते. बुधवारी त्याचे सूप वाजले. रात्रभर मृतदेह ताटकळत ठेवून दिवस उजाडल्यावर राज्यभर उमटणारा संताप, अधिवेशनात शेवटच्या दिवशी त्याचे पडसाद असा घटनापट या निमित्ताने आखण्यात आल्याचे खात्यातील गुप्तहेरांना कुणकूण लागली होती.

त्यासाठीच पोलिस अगदी संयमाच्या भूमिकेत राहिले. अखेर संपूर्ण विषयाची समजूत घालून ग्रामस्थ आणि कुटुंबीयांचे शंका निरसन झाल्यावर रात्री बारा वाजता रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होऊ शकला. अखेर बुधवारी सकाळी शवविच्छेदन होऊन सुखलाल सोनवणे यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले.

Family members and villagers of the accident victim stopped the road near the dead body till late at night, grumbling in the cold.
Jalgaon Municipality News : सीलकोट झालेल्या रस्त्यावर महापालिकेतर्फे खोदकाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.