कजगावला जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला; चोरटे पसार

generator
generatoresakal
Updated on

कजगाव (जि. जळगाव) : येथे चोरीचे (Robbery) सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आता पुन्हा एकदा चोरट्यांनी (Thieves) धाडस करून तब्बल आठ लाख रुपये किमतीचे जनरेटर (Generator) लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र पहारेकऱ्याने आरडाओरड केल्याने चोरटे तेथून पसार झाले. (attempt to steal generator at Kajgaon failed thieves ran away jalgaon crime news)

गेल्या काही दिवसांपासून गावात विविध ठिकाणांना चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. महादेव मंदिर, ऋषिबाबा मंदिर, कालिका माता मंदिरावर चोरट्यांनी हात साफ केल्याचे आढळून आले आहे. त्यातच कनाशी रस्त्यावरून काही दिवसांपूर्वी बैलजोडी चोरी झाली होती तर त्याच रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या शेतातील अडीच लाख रुपये किमतीची ताडपत्री चोरीला गेली होती. विशेष म्हणजे, त्याच रस्त्याजवळील कजगाव - पारोळा रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरील जनरेटर चोरीचा प्रयत्न फसला आहे. पहारेकऱ्याच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने भामट्यांचा पाठलाग केला. मात्र भामट्यांनी ट्रॅक्टर रस्त्यावरच सोडून पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाले. दहा दिवसातील ही कनाशी रस्त्यावरील तिसरी घटना असल्याने गावात खळबळ उडाली आहे.

चोरीसाठी ट्रॅक्टरचा वापर

प्राप्त माहितीनुसार जनरेटर चोरीसाठी वापरलेले ट्रॅक्टर हे चोरीचेच असल्याची माहिती पुढे येत आहे. हे ट्रॅक्टर २० मेस चाळीसगाव येथून चोरीला गेले आहे. तशा पद्धतीची फिर्याद ट्रॅक्टरमालकाने पोलिस ठाण्यात दिल्याचे कळते. मात्र चोरीच्या ट्रॅक्टरनेच पुन्हा चोरीचा प्रयत्न केल्याने सामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या वेळी पोलिस कर्मचारी नरेंद्र विसपुते, राजू सोनवणे, संभाजी पाटील, ग्रामसुरक्षा दलाचे योगेश चौधरी, प्रवीण महाजन, पहारेकरी रावसाहेब महाजन यांनी चोरट्यांना पाठलाग केला होता.

generator
Jalgaon : जुन्या वादातून मुलास बेदम मारहाण

"घटनेची माहिती कळताच आमच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहचून ट्रॅक्टरचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे ट्रॅक्टर रस्त्यावर सोडून पळून गेले आहेत. चोरीसाठी वापरलेले ट्रॅक्टर आम्ही जमा केले आहे."

- नरेंद्र विसपुते, पोलिस नाईक, कजगाव पोलिस मदत केंद्र

generator
जळगाव : मातेसह बाळासाठी डॉक्टरच ‘देवदूत’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.