Jalgaon Fraud Crime : केळी खरेदीत व्यापाऱ्याकडून फसवणुकीचा प्रयत्न; व्यापाऱ्यास 21 हजारांचा दंड

bananas News
bananas Newsesakal
Updated on

Jalgaon Fraud Crime : केळी व्यापाऱ्यासोबत दुय्यम प्रतीचे केळी घड देण्याबाबतचा सौदा केल्यानंतर व्यापाऱ्याने केळी बागेतील उच्च प्रतीची केळी कापून तालुक्यातील डांभुर्णी येथील केळी उत्पादकाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. (Attempted fraud by trader in purchase of bananas jalgaon fraud crime news)

केळी उत्पादकाने तत्काळ यावल बाजार समितीकडे तक्रार केली असता बाजार समितीने निरीक्षणाअंती व्यापाऱ्यास २१ हजार रुपयांचा दंड आकारत उत्पादकास उच्च मालाच्या फरकातील ९ हजार ६१२ रुपये देण्याचे आदेश दिले, बाजार समितीने तत्काळ केलेल्या कारवाईने तालुक्यातील केळी उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

डांभुर्णी (ता. यावल) येथील केळी उत्पादक पुरूजीत चौधरी यांनी धरणगाव येथील जावेद रहीम बागवान या व्यापाऱ्यासोबत केळी बागेतील दुय्यम प्रतीच्या केळीचे घड देण्याबाबतचा सौदा केला होता.

मात्र व्यापाऱ्याने बागेतील उच्च प्रतीचे घड कापले. पुरूजीत चौधरी यांनी शेतात जाऊन पाहिले असता व्यापाऱ्याने उच्च प्रतीचे घड कापल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर दुय्यम प्रतीच्या, केळी घडाचे रकमेनुसार २४ हजार ७८८ रुपयाचे बिल तयार केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

bananas News
Pune Fraud : जादा दराने हिरे विक्री करून महिलेची साडेतीन कोटींची फसवणूक

केळी उत्पादक चौधरी यांनी तत्काळ बाजार समितीकडे तक्रार दिली असता बाजार समितीच्या निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता तक्रारीत तथ्य आढळून आले.

निरीक्षकाने सभापती हर्षल पाटील, संचालक राकेश फेगडे, उज्जैनसिंग राजपूत, बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे यांचेसमक्ष पंचनामा केला. सभापती व संचालक मंडळांने शेतकऱ्यास उच्च प्रतीच्या मालानुसार ३४ हजार ४४० रुपये देण्याचे आदेश देत २४ हजार रुपयांचा व्यापाऱ्यास दंड आकारला.

व्यापाऱ्याचा माफिनामा

व्यापाऱ्यांनी कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी फरकाची रक्कम व दंडाची रक्कम भरण्याचे मान्य करत बाजार समितीला यापुढे अशी चूक करणार नसल्याचे नमूद करत माफिनामा लिहून दिला. बाजार समितीच्या या कारवाईने शेतकऱ्याची होणारे दहा हजार रुपयांचे नुकसान टळले आहे. बाजार समितीच्या या कारवाईने तालुक्यातील केळी उत्पादकात समाधान व्यक्त केले जात आहे.

bananas News
Jalgaon Fraud News : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोजवळ गेला अन... पायाखालची जमीनच सरकली...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.