Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या प्रशासकीय इमारतीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १६ वाहनांचा लिलाव जळगाव तहसील प्रशासनाने काढला आहे. येत्या गुरुवारी (ता. १) सकाळी अकराला या वाहनांची लिलाव प्रक्रिया होणार आहे. (Auction of 16 vehicles transporting illegal sand on 1 june jalgaon news)
वाहनधारकांनी आपले वाहन सोडविण्यासाठी दंडाची रक्कम भरावी व लिलाव प्रक्रिया थांबवावी, असे आवाहन तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले आहे. दरम्यान, १० मेस ‘सकाळ’ने ‘जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध वाळूच्या वाहनांची भरली जत्रा’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत हे लिलाव होणार आहेत. यात १२ ट्रॅक्टर, दोन डंपर, दोन ट्रकचा सामावेश आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दीड ते दोन वर्षांपासून अवैध वाळू वाहतूक करणारी डंपर, ट्रक, ट्रॅक्टर, ट्राली, अशी शंभरापेक्षा अधिक वाहने महसूल विभागाने जप्त करून ठेवली आहेत. अवैध वाळू नेणाऱ्या वाहनाला दंड लाखांत असतो. तेवढी वाहनांची किंमतही नसते. मात्र, वाळूची चोरी करणे गुन्हा आहे. दंड न भरल्यास वाहन जप्त केले जाते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अशा अनेक वाहनांनी अवैध वाळूचा उपसा केला. महसूलच्या कारवाईत वाहन जप्त केल्यानंतर दंडच भरावा लागतो. त्याशिवाय वाहन सोडले जात नाही. या वाहनांनीच प्रशासकीय इमारतीचे अर्धे मैदान भरले आहे. अनेक वाहने गंजली आहेत, तर काहींचे टायर चोरीस गेले आहेत.
दंड झालेल्या वाहन मालकांना महसूल प्रशासनाने अनेकवेळा नोटिसा दिल्या. तरीही मालक वाहन सोडविण्यासाठी आले नाहीत. अखेर या वाहनांचा लिलाव करून दंडाची रक्कम वसूल केली जात आहे.
वाहनधारकांच्या मालमत्तांवर बोजे
या लिलावात ज्या वाहनांचा लिलाव झाला नाही, अशा वाहनधारकांचा शोध घेऊन त्यांच्या मालमत्तांवर बोजे बसविणार आहेत. यात बँकेचे खाते सील करणे, मालमत्तांवर बोजे बसविण्यात येतील. जेणेकरून ते मालमत्तांची विक्री करू शकणार नाहीत, अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.