Jalgaon News : शहरातील घरपट्टी थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव; बड्या थकबाकीदारांवर महापालिकेचा दंडुका

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील लहान थकबाकीदार नोटीस मिळाल्यानंतर आपल्या मिळकतीची थकबाकीची रक्कम भरतात. परंतु काही मोठे थकबाकीदार अनेक नोटिसा देवूनही थकबाकी भरत नसल्याचे दिसून आले आहे.

अशा ३१९ थकबाकीदाराच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून येत्या दहा दिवसात ही प्रक्रिया करण्यात येणार आहे. (Auction of properties of mortgage defaulters in city by municipality jalgaon news)

शहरातील अनेक मालमत्ता धारकांकडून वेळेत मालमत्ता कर भरला जात नसल्यामुळे महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. जे मालमत्ताधारक पाच वर्षांपासून मालमत्ता कर भरत नाहीत अशा मालमत्ताधारकांच्या याद्या महापालिकेकडून तयार करण्यात आल्या आहेत.

यापैकी ३१९ मालमत्ताधारकांना अधिपत्र बजावून मालमत्ता कर भरण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. परंतु तरीही थकबाकीदार मालमत्ताधारकांकडून थकीत कराचा भरणा केला जात नसल्यामुळे महापालिकेकडून कठोर पाऊल उचलण्यात येत असून दिवाळीनंतर सदर मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.

Jalgaon Municipal Corporation
Chandrakant Patil News : एकनाथ खडसे यांच्याच पत्रामुळे पीकविमा मिळण्यात खोडा; चंद्रकांत पाटलांचा आरोप

शहरातील ३१९ मालमत्ताधारकांकडे सुमारे ४ कोटी रुपयांची थकबाकी असून महापालिकेने गेल्यावर्षी शंभर टक्के शास्ती माफीची अभय योजना जाहीर केली असताना देखील त्या मालमत्ता धारकांनी थकबाकी भरलेली नाही.

मालमत्त्तांची बोली लावणार

महापालिकेच्या महासभेतच मालमत्ता लिलावाचा ठराव करण्यात आला होता. थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव महापालिकेकडून केले जाणार आहेत. यामध्ये ज्या मालमत्ताना बोली लागत नसेल किंवा कमी बोली लागत असेल अशा मालमत्तांची बोली लावण्यासाठी महापालिकेच्या महासभेत झालेल्या ठरावानुसार मनपा आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

Jalgaon Municipal Corporation
Crop Insurance: राज्य, केंद्र सरकारच्या वाट्याची पीकविमा रक्कम कंपनीला मिळेना; दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.