Jalgaon News : आरटीओने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव; विभागाने मागविल्या हरकती

RTO
RTOesakal
Updated on

Jalgaon News : परिवहन विभागाच्या वायूवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्याखाली जप्त केलेल्या वाहनांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (Auction of seized vehicles by RTO will be held on April 26 jalgaon news)

संबंधित वाहनमालकांनी लिलावाच्या तारखेपर्यंत कार्यालयात थकीत कर/पर्यावरण कर/शासकीय दंडाच्या रकमेचा भरणा करून वाहने सोडवून घ्यावीत किंवा लिलावास हरकत घ्यावयाची असल्यास २४ एप्रिलपर्यंत लेखी हरकत घ्यावी, अन्यथा त्यांच्या वाहनांचा लिलाव २६ एप्रिलला दुपारी चारला करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

लिलाव करण्यात येणाऱ्या वाहनांची यादी वाहनांच्या प्रकारानुसार नोटीस बोर्डावर चिकटविण्यात आली आहे. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी एकूण आठ स्क्रॅप वाहनांसाठी डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात २६ एप्रिलच्या दुपारी एकपर्यंत कार्यालयात जमा करावा.

धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) हा Dy RTO, Jalgaon (payable at SBI Main Branch, Jalgaon) या नावे अंदाजित आठ वाहनांच्या बोली रकमेचा सी.टी.एस. मानंकाप्रमाणे नावनोंदणी करून कार्यालयात वरील दिवशी जमा करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

RTO
Jalgaon Bypoll Election : 82 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

लिलावासाठी एकदा जमा केलेला डीडी कोणत्याही कारणास्तव परत केला जाणार नाही. सोबत शॉपॲक्ट लायसन्स, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र व आधारकार्डची प्रत सादर करणे आवश्यक आहे. लिलावात सहभागी झालेल्या व्यक्तीसमोर लिलावाच्या दिवशी सर्वासमक्ष जमा झालेले बंद लिफाफ्यातील डिमांड ड्राफ्ट खुले करण्यात येतील.

ज्या व्यक्तीने सर्वाधिक किमतीचा डिमांड ड्राफ्ट जमा केला असेल, त्याच खरेदीदारास ते वाहन लिलावाद्वारे विक्री करण्यात येईल. लिलावाचे स्थळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव हे असून, जाहीर लिलाव करावयाचे वाहने, अटकावून ठेवलेल्या वाहनांची यादी व स्थळ, लिलावाच्या अटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. कोणतेही कारण न देता लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

RTO
Jalgaon Market Committee Election : 11 जागांवर शिंदे गट, 7 जागांवर ‘भाजप’ लढणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.