Jalgaon Crime News : औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ललित उमाकांत दीक्षित याच्यावर ‘एमपीडीए’अंतर्गत एक वर्षे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी ‘एमपीडीए’ अंतर्गत वर्षभरात ४७ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.(Auction under MPID against accused Lalit Dixit jalgaon crime news)
जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे.
ईश्वर कॉलनीत राहणाऱ्या ललीत दीक्षितवर हाणामारी, शिवीगाळ, लूटमार, जबरी वसुली, चोरी, फसवणूक, दंगा, बेकायदेशीर जमाव जमवून प्रशासनास वेठीस धरणे, प्राणघातक हल्ला आदी गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.