जळगाव : काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील (तात्या) खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणे याची औरंगाबाद उच्च न्यायालयाने (Court) तब्बल १८ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे.
या वृत्ताला जळगाव न्यायालयात राजू सोनवणे याची बाजू मांडणारे अॅड. एस. के. कौल यांनी दुजोरा दिला आहे. (Aurangabad High Court acquitted Raju Sonawane main accused in Patil Murder case after 18 years jalgaon news)
काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील त्यांच्या निवासस्थानातून कारने २१ सप्टेंबर २००५ ला नूतन मराठा महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले होते. मानराज पार्कसमोरच मैदानात त्यांच्या पाळतीवर असलेल्या दोन हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी चाकूने भोसकत त्यांची हत्या केली होती.
जिल्हापेठ पोलिसांत या प्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन तपासाधिकारी वाय. डी. पाटील यांच्यासह पथकाने २५ सप्टेंबर २००५ ला काँग्रेस कार्यकर्ता राजू माळी व त्याचा शालक राजू सोनवणे या दोघांना नंतर ६ नोव्हेंबर २००५ ला लीलाधर नारखेडे व दामू लोखंडे यांना अटक केली होती.
राजू माळीचा मृत्यू अन् जन्मठेप
न्यायालयाने ३ फेब्रुवारी २००६ ला नारखेडे व लोखंडे यांचा एफआयआर रद्द केली होती. नंतर सुप्रीम कोर्टानेही हाच निकाल कायम ठेवला होता. दुसरीकडे माळी व सोनवणे यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयात खटला चालू असताना ६ एप्रिल २००७ ला राजू माळी याचा दुर्धर आजाराने कोठडीत असताना उपचारार्थ दाखल झाल्यावर मृत्यू झाला होता.
त्यानंतर राजू सोनवणेविरोधात खटला सुरू राहिला. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये खटल्याचा निकाल होऊन जळगाव जिल्हा न्यायालयाने राजू सोनवणे यास खून करणे व खुनाचा कट रचणे या आरोपाखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर संशयिताच्या वतीने औरंगाबाद उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी अनेक वर्षांपासून सुनावणी सुरू होती.
१७ फेब्रुवारी २०२३ ला न्यायमूर्ती वि. भा. कनकवडी, न्या. अभय एस. वाघवासे यांच्या संयुक्त पीठाने निकाल देताना जन्मठेप भोगत असलेला आरोपी राजू चिंतामण सोनवणे (माळी) याची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिलेत.
या निकालाची संक्षिप्त ऑर्डर खंडपीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. संपूर्ण ऑर्डर समोर आल्यावरच खंडपीठाच्या निकालात नेमकं काय म्हटलंय हे समजू शकेल, असेही विधिज्ञांचे म्हणणे आहे.
"खंडपीठाने या प्रकरणी १७ फेब्रुवारीला निकाल दिला आहे. जिल्हा न्यायालयात दाखल कामकाजाप्रसंगी सदर कामकाजावरच खंडपीठातही कामकाज चालले. याचिकाकर्त्याच्या वतीने पूर्वी ॲड. शर्मा कामकाज पाहात होते."
"मात्र त्यांचे निधन झाल्यावर खंडपीठाने विधी सेवेंतर्गत ॲड. काझी यांची नियुक्ती केली होती. जन्मठेप झालेल्या राजू सोनवणे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे खंडपीठाच्या आदेशात म्हटले आहे. परंतु पूर्ण ऑर्डर एक- दोन दिवसांत संकेतस्थळावर येईल, त्याचवेळी नेमकं खंडपीठाने काय म्हटलं आहे, ते सांगता येईल." - अॅड. एस. के. कौल, आरोपी राजू सोनवणे यांचे वकील, जळगाव
पाटील द्विय प्रकरणात स्थगिती कायम
तत्कालीन न्या. डी. जे. शेकोकार यांच्या न्यायालयात प्रा. व्ही. जी. पाटील खून खटल्याचे कामकाज सुरू असताना मुख्य संशयित राजू माळी, राजू सोनवणे यांच्यासह दामोदर लोखंडे, लीलाधर नारखेडे यांची नावे पुढे आली होती.
राजू सोनवणेला शिक्षा झाली त्यानंतर दोघांविरुद्ध स्वतंत्रपणे खटल्याचे कामकाज सुरू राहिले. तर डॉ. उल्हास पाटील, जी. एन. पाटील यांचा (कलम-३१९) फिर्यादीत समावेश करावा, असे न्यायालयाने नोंदविले होते. त्याला औरंगाबाद खंडपीठाने २०१६ मध्येच स्थगिती दिली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.