वाहनांच्या विम्याचा ‘टॉप गियर’; थर्ड पार्टी इन्शुरन्स 10 टक्क्यांनी महागला

Car Insurance
Car Insuranceesakal
Updated on

जळगाव : देशातील जनता दरवाढीने (inflation) त्रस्त असताना, आता वाहनाचा विमाही (vehicle insurance) महाग झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या, सिलिंडरचे (Petrol, Diesel , Cylinder) दर सर्वसामान्याच्या आवाक्यात नाहीत. वाहनधारकांची पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात आता थर्ड पार्टी इन्शुरन्स दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुचाकींचा थर्ड पार्टी (Third Party) इन्शुरन्स काढण्याचे प्रमाण कमी होते. आता दरवाढीने ते अजून कमी होणार आहे. (auto insurance Third party insurance rose 10 percent Jalgaon news)

वाहनाचा विमा काढणे अनिवार्य आहे. अनेक वाहनधारक केवळ चारचाकीचा विमा काढतात. फुल विम्याच्या तुलनेत थर्ड पार्टी विम्याचे दर तुलनेने कमी असतात. त्याकडे आता दुर्लक्ष होण्याची दाट शक्यता आहे.

वाहन विम्याचे दोन प्रकार

पहिला प्रकार ‘फुल इन्शुरन्स’ असतो. यात स्वतःच्या वाहनासह समोरच्याच्या वाहनाचाही इन्शुरन्स असतो. याला परिपूर्ण इन्शुरन्स म्हणतात. वाहनाला अपघात झाल्यास दोन्ही पार्टीला इन्शुरन्स मिळतो. विशेषतः चारचाकी वाहनधारक असा इन्शुरन्स काढतात. याचा दर जादा असतो. दुसरा प्रकार थर्ड पार्टी इन्शुरन्सचा असतो. यात वाहनाला अपघात झाल्यास समोरच्या पार्टीला इन्शुरन्सची रक्कम मिळते. याचा दर कमी असतो. नवीन दुचाकी घेतल्यानंतर एकदा इन्शुरन्स काढतात. नंतर काढत नाही, असा अनुभव आहे.

Car Insurance
यावल वन विभागाची कारवाई; वनक्षेत्रातील 61 झोपड्या जमीनदोस्त

वाहन विम्याचे दर असे (१८ टक्के जीएसटी वेगळा)

वाहनाचा प्रकार--जुने दर--नवीन दर--फरक

दुचाकी ः

* ७५ सीसीपर्यंत--४८२--५३८--५६

* ७५ ते १५० सीसी--७५२--७१४--३८

* १५० ते ३५० सीसी--११९३--१३६६--१७३

* ३५० सीसीवर--२३२३--२८०४--४८१

पीव्हीटी कार ः

* १००० सीसीपर्यंत--२०७२--२०९४--२२

* १००० ते १५०० सीसी--३२२१--३४१६--१९५

* १५०० सीसीवरील --७८९०--७८९७--७

Car Insurance
Jalgaon : 50 हजारासाठी विवाहितेचा छळ; सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल

"इंधनाच्या दरवाढीमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. आता थर्ड पार्टी विमाही वाढल्याने हा विमा काढणे महागात पडणार आहे. यामुळे वाहनधारक असा विमा काढावा किंवा नाही याचा विचार नक्कीच करतील." -आकाश इंगळे, वाहनधारक

"वाहन कायद्यानुसार दुचाकी, चारचाकी वाहनांचा विमा काढणे गरजेचे आहे. ‘परिपूर्ण विमा’ (पूर्ण विमा), ‘थर्ड पार्टी विमा’, असे दोन प्रकार आहेत. किमान थर्ड पार्टी विमा काढला, तर समोरील पार्टीस नुकसानभरपाई विमा कंपनी देते. हा विमा नक्की काढावा."

- ॲड. जमील देशपांडे, वाहन विमा सल्लागार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.