Jalgaon News : तालुक्यातील इंदापिंप्री येथील सेवानिवृत्त पोलिस पाटील यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत गावाच्या विकासासाठी नाला खोलीकरणाच्या विधायक कार्याला सुरवात केली आहे.
पोलिस पाटलांच्या निर्णयाने १० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊन ५० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.(avoiding retirement program costs Deepening of canal in village Model of Indrapimpri Police Patil 10 Dalghami water reservoirs Jalgaon News)
अमळनेर तालुक्यातील इंदापिंप्री येथील पोलीस पाटील भानुदास पाटील हे सेवानिवृत्त होत आहेत.सेवानिवृत्तीबद्दल सहकारी आणि पोलीस खात्याला तिखट जेवणाचा बेत आखण्यात आला. पोलीस पाटील डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांना आमंत्रण द्यायला गेले आणि डीवायएसपीनी बेतच बदलवला.
अरे बाबा आम्हाला जेवण देऊन वायफळ खर्च करण्यापेक्षा तुझ्या गावात नदी ,नाला खोलीकरण कर. नदी नाला नांगरून घे. त्यामुळे टंचाई दूर होऊन शेतीसाठी सिंचन वाढेल. डीवायएसपींची सूचना पोलीस पाटलाला आवडली आणि त्यांनी तिखट जेवणाचा बेत रद्द केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधला आणि गावाबाहेर नाला खोलीकरण ,माती बांध चे काम हाती घेतले. आणि अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून शनी अमावस्येला नाला खोलीकरणाचा शुभारंभ डीवायएसपी नन्दवाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
इंदापिंप्री येथे दोन वर्षांपूर्वी टँकर लागत होते. येथील खोलीकरण मुळे सुमारे १० दशलक्ष पाणी साठा वाढणार असून सिंचन क्षमताही वाढेल त्यामुळे ५० हेक्टर जमिनीला फायदा होणार आहे. शुभारंभ प्रसंगी नंदवाळकर आणि तालुका कृषी अधिकारी भारत वारे यांनी लोकसहभागाचे आवाहन करताच धनराज गंगाराम पाटील या शेतकऱ्याने देखील स्वतःहून नाला नांगरण्याचे जाहीर केले. यावेळी सरपंच रवींद्र भिल , उपसरपंच शोभाबाई पाटील , कृषी पर्यवेक्षक अविनाश खैरनार , कृषी सहाय्यक सुप्रिया पाटील , किरण पाटील यांच्यासह ग्रामस्थ हजर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.