Jalgaon News: राष्ट्रीय परिषदेत पाल येथील शेतकऱ्याचा सन्मान; पीक वाण सरंक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार

Balamukund Mahajan accepting the award at the national event. Along with Satpura Development Board Secretary Ajit Patil, scientist Mahesh Mahajan.
Balamukund Mahajan accepting the award at the national event. Along with Satpura Development Board Secretary Ajit Patil, scientist Mahesh Mahajan.esakal
Updated on

Jalgaon News : सोळाव्या राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान परिषद, कोची, केरळ येथील कार्यक्रमात शेतकरी पीक वाण सरंक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पाल (ता. रावेर) कृषी विज्ञान केंद्राचे प्रगतिशील शेतकरी बालमुकुंद महाजन यांना भारतीय कृषी अनुसंधान परिषद, दिल्लीचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.(Award to Balmukund Mahajan for outstanding work in field of crop variety conservation jalgaon news )

श्री. महाजन यांनी २००७ या वर्षी एकूण ९१० मोह झाडांची लागवड केली असून ५ प्रकारच्या मोह जातींचे संगोपन केले आहे. तसेच मोह फुलांपासून तेल,पेंड व सिरप ही मूल्यवर्धित उत्पादने करून मोह शेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग जिल्ह्यात यशस्वी केला आहे.

मोह शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनात्मक कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, पाल (जळगाव -१) यांनी तांत्रिक मार्गदर्शन करून जिल्ह्यात पर्यायी शेतीस चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान परिषद दरम्यान शेतकरी पीक वाण संवर्धन चर्चासत्रात श्री.महाजन यांनी मोह शेतीचा अनुभव मांडला व मोह वृक्षाचे महत्त्व विषद करून मोह शेती फायद्याची होण्यासाठी एलसीडी प्रोजेक्टरवर सादरीकरण केले.

Balamukund Mahajan accepting the award at the national event. Along with Satpura Development Board Secretary Ajit Patil, scientist Mahesh Mahajan.
Jalgaon News : 9 वर्षांत वाचवले अडीच लाख रूग्णांचे प्राण; 108 रुग्णवाहिकेची जलद सेवा

या प्रसंगी डॉ.दिनेश अग्रवाल (रजिस्ट्रार जनरल, पीक वाण सरंक्षण संस्था, नवी दिल्ली), डॉ. पी. एल. गौतम, डॉ. पी. दास (डीडीजी, आयसीएआर), डॉ.तुषार अथारे (अटारी, पुणे), अजित पाटील (सचिव, सातपुडा विकास मंडळ, पाल), प्रा.महेश महाजन (प्र.वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख,कृषी विज्ञान केंद्र, पाल) व विविध राज्यातील शेतकरी उपस्थित होते.

चार दिवसीय या कृषी परिषद निमित्ताने कृषी प्रदर्शन दालनात पाल कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलला देशभरातील विविध शेतकऱ्यांनी व भारतीय कृषी अनुसंधान परिषद,नवी दिल्ली येथील डॉ.बर्मन (एडीजी) डॉ. ए के सिंग (कुलगुरू,राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ,झांसी), डॉ. एस के. रॉय (संचालक, एटीएआरआय, पुणे), डॉ. एस. एन. के. सिंग (संचालक, एटीएआरआय, जबलपूर), डॉ. एस. एस. मीरा (डायरेक्टर, एटीएआरआय, हैद्राबाद) यांनी भेट देऊन मोह शेतीबाबत माहिती घेऊन मार्गदर्शन केले.

Balamukund Mahajan accepting the award at the national event. Along with Satpura Development Board Secretary Ajit Patil, scientist Mahesh Mahajan.
Jalgaon News : 9 वर्षांत वाचवले अडीच लाख रूग्णांचे प्राण; 108 रुग्णवाहिकेची जलद सेवा

पाल कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील मोह शेतीचा नवीन प्रयोगाची दखल कृषी राष्ट्रीय परिषद घेऊन गौरव केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, सचिव अजित पाटील यांनी आनंद व्यक्त केला असून कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे व प्रयोगशील शेतकरी यांचे अभिनंदन केले आहे.

Balamukund Mahajan accepting the award at the national event. Along with Satpura Development Board Secretary Ajit Patil, scientist Mahesh Mahajan.
Jalgaon News: जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम; प्राप्त निधीशी वितरित निधीची 31.25 टक्केवारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.