Banana Crop Insurance : मागील वर्षातील केळी पीकविम्याची व या वर्षातील २७ महसूल मंडळांतील २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची दक्षता घेण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी (ता. ३१) पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना दिल्या. (Ayush Prasad statement Banana crop insurance and 25 percent advance compensation give before Diwali jalgaon news)
जिल्ह्यातील प्रलंबित पीकविम्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त तक्रार अर्जांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी राहुल पाटील, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील उपस्थित होते.
जिल्ह्यातील २०२२-२३ मधील केळी पिकांचे नुकसान भरपाईबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून कृषीचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे पाठपुरावा करून दिवाळीपूर्वी विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करावी.
प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत २०२३-२४ साठी जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाईची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कंपनीचे सर्व आक्षेप यापूर्वी नाशिक विभागीय आयुक्तांनी फेटाळले आहेत. तेव्हा २५ टक्के अग्रिम नुकसानभरपाईची रक्कम ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग करण्यात यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.