Jalgaon News : भारत निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. २७ ऑक्टोबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून आजपासून प्रत्येक विशेष शिबिर घेणे सुरू केले आहे.
या कालावधीत संबंधित यादी भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांना मदत करण्यासाठी पूर्णवेळ उपस्थित राहत आहेत. (ayush prasad statement of Special camp at each polling station jalgaon news )
नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन निवडणूक विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रमांतर्गत २७ ऑक्टोबर रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रत्येक मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही? याची खात्री मतदारांनी करावी.
मतदार यादीत नाव नसल्यास त्यासाठी आपला फॉर्म नमुना-६ म्हणजेच मतदार नाव नोंदणीसाठी आवश्यक नमुना फॉर्म भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसिल कार्यालयातील मतदार मदत केंद्रात जमा करावा.
ज्या व्यक्तीचे १ जानेवारी २०२४ रोजी वय १८ वर्ष पूर्ण होत आहे, परंतु मतदार यादीत नाव नाही अशा व्यक्तीने आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेण्यासाठी फॉर्म नमुना ६ भरून द्यावा.
मतदार संघातील एका यादी भागातून दुसऱ्या यादी भागात स्थलांतर झाले असल्यास नवीन यादी भागात नाव समाविष्ट करण्यासाठी व एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ८ भरून द्यावा. ज्या मतदाराच्या मतदार यादीतील तपशिलात (नाव, वय, लिंग, फोटो) इ. मध्ये काही चुका असल्यास त्या दुरुस्त करून घेण्यासाठी फॉर्म नमुना-८ भरून द्यावा.
जिल्ह्याच्या मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांच्या नावांची वगळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदारांनी स्वतः पुढाकार घ्यावा. मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्याची कार्यवाही करावी. कुटुंबातील एखादी व्यक्ती मयत झाली असल्यास त्या व्यक्तीचे नाव मतदार यादीमधून वगळण्यासाठी मृत्यूच्या दाखल्यासह फॉर्म नमुना ७ भरून द्यावा.
जिल्ह्यात मतदार यादीत ज्या मतदारांचे नावे दुबार आहेत, अशा दुबार मतदारांनी आपण ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे वास्तव्य करतो, त्या ठिकाणी मतदार यादीत नाव कायम ठेवून उर्वरित ठिकाणची नावे वगळणेसाठी फॉर्म नमुना ७ भरून द्यावा.
मतदाराची जर बदली किंवा इतर कारणामुळे स्थलांतर झाले असल्यास त्याने पूर्वीच्या ठिकाणच्या नावाची वगळणी करावी व नवीन रहिवासाच्या ठिकाणी नाव मतदार यादीत समाविष्ट करावे. युवा मतदारांची नाव नोंदणी वाढविण्यासाठी संबंधित महाविद्यालयातही ही मोहीम राबविण्यात येत आहे.
पुनःरिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा असून राजकीय पक्षांनी आपले प्रतिनिधींची मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएचए) म्हणून नेमणूक करावी.
१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या परिसरात संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.