Diwali 2023 : दिवाळीत फटाक्यांपासून पाळीव प्राणी, पशुधनाची काळजी घ्या : आयुष प्रसाद

जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद
जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसादSakal
Updated on

Diwali 2023 : दिवाळी सण साजरा करताना पशुधन व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. फटाके फोडताना पशुपक्ष्यांना जाणूनबुजून त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, हेतुपुरस्सर त्रास देणाऱ्या व्यक्तींची माहिती १०० क्रमांकावर पोलिसांना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी केले आहे.(Ayush Prasad statement of Take care of pets and livestock from crackers on Diwali jalgaon news)

आगामी दीपावली सण साजरा करताना लहान तसेच मोठ्या प्राण्यांना कुठलीही इजा होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. जनावरांना मारहाण करणे, चटके देणे तसेच पाळीव प्राणी म्हणजे मांजर, कुत्रे व इतर पशुधन यांना फटाक्यांच्या आवाजाने इजा होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

हेतुपुरस्सरपणे अशा प्रकारच्या त्रास देणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना १०० या दूरध्वनी क्रमांकावर कळविण्यात यावी किंवा पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार नोंदविण्यात यावी. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम १९६० अंतर्गत फौजदारी कार्यवाही करण्याची तरतूद असून त्यासाठी ३ ते १० वर्षं कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.

जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद
Diwali 2023 : जातीभेदाच्या पलिकडे! हिंदू-मुस्लिम समाज एकत्र येऊन साजरा करतो दिवाळी, अनेक वर्षांची आहे परंपरा!

त्यामुळे असा गुन्हा आपल्याकडून होणार नाही. याची काळजी विशेषतः युवा वर्गाने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

अशी घ्या पशुधनाची काळजी

* प्राण्यांना घरात एकटे सोडू नका.

* प्राणी फटाक्यांना घाबरतात त्यांना फटाक्याजवळ नेऊ नका

* फटाक्यांची राख प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांच्या फुफ्फुसावर परिणाम होतो

* फटाके फोडून झाल्यावर त्या राखेवर पाणी टाका.

जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद
Diwali 2023: लक्ष्मी पूजनसाठी वेगळा लूक हवाय? हे इअर रिंग्स नक्की ट्राय करुन पाहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.