Jalgaon News : धावण्यासह इतर विविध खेळांमध्ये खेळाडूंचा सहभाग वाढला पाहिजे. त्यासाठी जळगावच्या क्रीडा संकुलात चांगल्या दर्जाच्या ‘सिंथेटिक ट्रॅक’चे काम लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.
जळगाव रनर्स ग्रुपतर्फे येत्या ३ डिसेंबरला होणाऱ्या ‘खानदेश रन’च्या टी शर्ट आणि पदकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. ( Ayush Prasad statement Synthetic track in sports complex soon jalgaon news )
भुसावळ रेल्वे विभागाच्या मंडल रेल्वे प्रबंधक इति पांडे, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, मयूर शिंदे, मनोज अडवाणी, रिषभ जैन, शिल्पा चोरडिया यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले.
इति पांडे यांनी ‘रनिंग'मुळे माझ्या नोकरीच्या ठिकाणी सकारात्मक बदल कसा झाला यासह स्वतःचा ‘रनिंग' चा प्रवास याबाबत माहिती दिली.
पोलीस अधीक्षकांनी जळगाव पोलीस दलातर्फे २०० पोलीस या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे सांगत स्पर्धेदरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्याचे स्पष्ट केले. टी-शर्ट, पदक अनावरणाप्रसंगी जळगाव रनर्स ग्रुपचे १०० सदस्य उपस्थित होते.
जळगाव रनर्स ग्रुपचे अध्यक्ष किरण बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तुषार चोथानी, राहुल त्रिवेदी यांनी सूत्रसंचालन केले. https://jalgaonrunners.com/ या लिंकवर जाऊन नागरिकांनी परिवार आपण व इतरांना सुद्धा या खानदेश रन मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे श्री. बच्छाव यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.